S M L

कोल्हापूरपमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

16 जानेवारीकोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीदरम्यान आज जोरदार राडा झाला. माजी जिल्हाध्यक्ष पी एन पाटील यांच्या समर्थकांनी माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. या दरम्यान एकमेकांचे कपडे फाडले. पी एन पाटील यांनी या पूर्वीच जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर नवा जिल्हाध्यक्ष निवडणूक आज होती. या करीता माजी प्रदेश्याध्यक्ष रणजित देशमुख कोल्हापूरात निरीक्षक म्हणून आले होते. यादरम्यान दोन्ही नेत्यांचे समर्थकांत घोषणायुध्द रंगल होतं. काहीवेळानी या घोषणायुध्दचं रुपांतर हाणामारीत झालं. माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी अध्यक्षपदाचा अर्ज भरला आणि संतप्त होवून निघून गेले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 16, 2011 01:36 PM IST

कोल्हापूरपमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

16 जानेवारी

कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीदरम्यान आज जोरदार राडा झाला. माजी जिल्हाध्यक्ष पी एन पाटील यांच्या समर्थकांनी माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. या दरम्यान एकमेकांचे कपडे फाडले. पी एन पाटील यांनी या पूर्वीच जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर नवा जिल्हाध्यक्ष निवडणूक आज होती. या करीता माजी प्रदेश्याध्यक्ष रणजित देशमुख कोल्हापूरात निरीक्षक म्हणून आले होते. यादरम्यान दोन्ही नेत्यांचे समर्थकांत घोषणायुध्द रंगल होतं. काहीवेळानी या घोषणायुध्दचं रुपांतर हाणामारीत झालं. माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी अध्यक्षपदाचा अर्ज भरला आणि संतप्त होवून निघून गेले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 16, 2011 01:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close