S M L

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल निश्चित !

17 जानेवारीयेत्या 48 तासात केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहे. या संदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंग आज राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. या संदर्भात पंतप्रधानांनी सोनिया गांधी यांची गेल्या आठवड्यात 5 वेळा भेट घेतली होती. शशी थरुर, पृथ्वीराज चव्हाण आणि ए राजा याच्या राजीनाम्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातील काही जागा रिक्त झाल्यात त्या भरावयाच्या आहे. शरद पवार आणि कपिल सिब्बल यांची काही खाती कमी होण्याची शक्यता आहे. काही युवा चेहरे मंत्रिमंडळात घेण्याची शक्यता आहे. या महिन्यात काँग्रेस कार्यकारीणीतही काही बदल होणार आहे.पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारला दीड वर्षं पूर्ण होतं आहे आणि त्यांच्या या दुसर्‍या टर्मच्या टीममध्ये पहिल्यांदाच फेरबदल होत आहेत. या बदलांमधून रिकाम्या जागा भरण्याचा आणि मंत्रिमंडळाला थोठ्या तरूण चेहरा देण्याचा ते प्रयत्न करतील. पण ते करत असताना त्यांना मित्रपक्षांच्या मागण्यांचा आणि काँग्रेस पक्ष संघटनेचाही विचार करावा लागणार आहे. 22 मे 2009 डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान म्हणून दुसर्‍यांदा शपथ घेतली. या दुसर्‍या इनिंगमध्ये त्यांची स्थिती भक्कम होती. काँग्रेसला दोनशेवर जागा होत्या. मित्रपक्षांचा दबाव कमी झाला होता. पण वाटली होती तेवढी ही इनिंग सोपी नाही. एकामागून एक घोटाळे झाले. आणि एक एक मंत्री बाहेर होऊ लागले. आयपीएल प्रकरणी परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर गेले. मग आदर्श घोटाळ्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांना महाराष्ट्रात पाठवलं. त्यानंतर 2जी महाघोटाळ्यामुळे ए राजांची विकेट गेली. या तीन रिकाम्या जागा पंतप्रधानांना भरायच्या आहेत. या तीनही जागी काँग्रेसचेच नेते बसवले जाणार आहेत. राजांची जागाही काँग्रेसला दिल्याने द्रमुकला एक जादा मंत्रीपद हवं आहे. त्यामुळे बालू किंवा इलंगोवनला एक जागा मिळू शकते. पश्चिम बंगालमधल्या निवडणुकांवर डोळा ठेवून तृणमूलला आणखीन एक राज्यमंत्रीपद हवंय. राष्ट्रवादीच्या कोट्यातही बदल होणार आहेत. पवारांचं एक खातं कमी होणार आहे. त्याबदल्यात प्रफुल्ल पटेलांना बढती देऊन कॅबिनेट पद मिळावं अशी राष्ट्रवादीची मागणी आहे.काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारणही जोरदार सुरू आहे. एका नेत्याला एकच पद असा नियम लावल्यामुळे काही बड्या नेत्यांना लाल दिवा सोडावा लागणार आहे. गुलाम नबी आझाद आणि अंबिका सोनींसारख्या नेत्यांनी पक्ष संघटनेत लक्ष घालावं अशी हायकमांडची इच्छा आहे. त्यामुळे त्यांना खुर्ची रिकामी करावी लागणार आहे. उत्तर प्रदेशातल्या निवडणुकांचा विचार करून सलमान खुर्शीद यांना बढती मिळणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. पण भ्रष्टाचाराने ग्रासलेल्या मंत्रिमंडळात मोठे बदल पंतप्रधान करतील याची शक्यता कमीच आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 17, 2011 09:52 AM IST

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल निश्चित !

17 जानेवारी

येत्या 48 तासात केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहे. या संदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंग आज राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. या संदर्भात पंतप्रधानांनी सोनिया गांधी यांची गेल्या आठवड्यात 5 वेळा भेट घेतली होती. शशी थरुर, पृथ्वीराज चव्हाण आणि ए राजा याच्या राजीनाम्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातील काही जागा रिक्त झाल्यात त्या भरावयाच्या आहे. शरद पवार आणि कपिल सिब्बल यांची काही खाती कमी होण्याची शक्यता आहे. काही युवा चेहरे मंत्रिमंडळात घेण्याची शक्यता आहे. या महिन्यात काँग्रेस कार्यकारीणीतही काही बदल होणार आहे.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारला दीड वर्षं पूर्ण होतं आहे आणि त्यांच्या या दुसर्‍या टर्मच्या टीममध्ये पहिल्यांदाच फेरबदल होत आहेत. या बदलांमधून रिकाम्या जागा भरण्याचा आणि मंत्रिमंडळाला थोठ्या तरूण चेहरा देण्याचा ते प्रयत्न करतील. पण ते करत असताना त्यांना मित्रपक्षांच्या मागण्यांचा आणि काँग्रेस पक्ष संघटनेचाही विचार करावा लागणार आहे.

22 मे 2009 डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान म्हणून दुसर्‍यांदा शपथ घेतली. या दुसर्‍या इनिंगमध्ये त्यांची स्थिती भक्कम होती. काँग्रेसला दोनशेवर जागा होत्या. मित्रपक्षांचा दबाव कमी झाला होता. पण वाटली होती तेवढी ही इनिंग सोपी नाही. एकामागून एक घोटाळे झाले. आणि एक एक मंत्री बाहेर होऊ लागले. आयपीएल प्रकरणी परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर गेले. मग आदर्श घोटाळ्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांना महाराष्ट्रात पाठवलं. त्यानंतर 2जी महाघोटाळ्यामुळे ए राजांची विकेट गेली.

या तीन रिकाम्या जागा पंतप्रधानांना भरायच्या आहेत. या तीनही जागी काँग्रेसचेच नेते बसवले जाणार आहेत. राजांची जागाही काँग्रेसला दिल्याने द्रमुकला एक जादा मंत्रीपद हवं आहे. त्यामुळे बालू किंवा इलंगोवनला एक जागा मिळू शकते. पश्चिम बंगालमधल्या निवडणुकांवर डोळा ठेवून तृणमूलला आणखीन एक राज्यमंत्रीपद हवंय. राष्ट्रवादीच्या कोट्यातही बदल होणार आहेत. पवारांचं एक खातं कमी होणार आहे. त्याबदल्यात प्रफुल्ल पटेलांना बढती देऊन कॅबिनेट पद मिळावं अशी राष्ट्रवादीची मागणी आहे.

काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारणही जोरदार सुरू आहे. एका नेत्याला एकच पद असा नियम लावल्यामुळे काही बड्या नेत्यांना लाल दिवा सोडावा लागणार आहे. गुलाम नबी आझाद आणि अंबिका सोनींसारख्या नेत्यांनी पक्ष संघटनेत लक्ष घालावं अशी हायकमांडची इच्छा आहे. त्यामुळे त्यांना खुर्ची रिकामी करावी लागणार आहे. उत्तर प्रदेशातल्या निवडणुकांचा विचार करून सलमान खुर्शीद यांना बढती मिळणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. पण भ्रष्टाचाराने ग्रासलेल्या मंत्रिमंडळात मोठे बदल पंतप्रधान करतील याची शक्यता कमीच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 17, 2011 09:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close