S M L

शरद पवार यांचं खातं कमी होणार?

18 जानेवारीकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. नावांची यादी तयार करण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात आज दिवसभरात सहा वेळा चर्चा झाली. शरद पवार यांच्याकडचं अन्न आणि नागरी पुरवठा यापैकी एक खातं कमी होण्याची शक्यता आहे. ते खातं काँग्रेसच्या मंत्र्याकडे जाईल. तसेच महाराष्ट्रातले काँग्रेसचे बडे नेते विलासराव देशमुख यांची रवानगी पक्षसंघटनेत करण्यात येईल अशीही शक्यता आहे. कमलनाथ, अंबिका सोनी आणि गुलाब नबी आझाद यांची मंत्रिपदं जाऊन त्यांना पक्षाचं कामकाज दिलं जाऊ शकतं. सलमान खुर्शीद यांची कॅबिनेट मंत्रीपदी बढती होऊ शकते. कपील सिब्बल यांच्याकडे दूरसंचार मंत्रालय कायम राहू शकतं. पण त्यांच्याकडचे मनुष्यबळ विकास मंत्रालय जाण्याची शक्यता आहे. तरुण चेहर्‍यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. प्रणव मुखर्जी, पी. चिदंबरम, एस एम कृष्णा आणि ए के. अँटोनी यांच्या मंत्रालयात कोणतेच बदल होणार नाहीत. मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता- शरद पवार - अन्न खातं कमी होणार- विलासराव देशमुख - पक्ष संघटनेत रवानगीची शक्यता- गुलाम नबी आझाद - पक्ष संघटनेत रवानगी होणार- अंबिका सोनी - पक्ष संघटनेत रवानगी होणार- एम एस गिल - मंत्रिपद जाण्याची शक्यता- वीरप्पा मोईली - मंत्रिपद जाण्याची शक्यता- ज्योतिरादित्य शिंदे - जबाबदारी वाढणार- सचिन पायलट - जबाबदारी वाढणा- मनिष तिवारी - मंत्रिपद मिळण्याची शक्यता- जयंती नटराजन - मंत्रिपद मिळण्याची शक्यता- अभिषेक मनु सिंघवी - मंत्रिपद मिळण्याची शक्यता

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2011 05:04 PM IST

शरद पवार यांचं खातं कमी होणार?

18 जानेवारी

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. नावांची यादी तयार करण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात आज दिवसभरात सहा वेळा चर्चा झाली. शरद पवार यांच्याकडचं अन्न आणि नागरी पुरवठा यापैकी एक खातं कमी होण्याची शक्यता आहे. ते खातं काँग्रेसच्या मंत्र्याकडे जाईल. तसेच महाराष्ट्रातले काँग्रेसचे बडे नेते विलासराव देशमुख यांची रवानगी पक्षसंघटनेत करण्यात येईल अशीही शक्यता आहे. कमलनाथ, अंबिका सोनी आणि गुलाब नबी आझाद यांची मंत्रिपदं जाऊन त्यांना पक्षाचं कामकाज दिलं जाऊ शकतं. सलमान खुर्शीद यांची कॅबिनेट मंत्रीपदी बढती होऊ शकते. कपील सिब्बल यांच्याकडे दूरसंचार मंत्रालय कायम राहू शकतं. पण त्यांच्याकडचे मनुष्यबळ विकास मंत्रालय जाण्याची शक्यता आहे. तरुण चेहर्‍यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. प्रणव मुखर्जी, पी. चिदंबरम, एस एम कृष्णा आणि ए के. अँटोनी यांच्या मंत्रालयात कोणतेच बदल होणार नाहीत.

मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता

- शरद पवार - अन्न खातं कमी होणार- विलासराव देशमुख - पक्ष संघटनेत रवानगीची शक्यता- गुलाम नबी आझाद - पक्ष संघटनेत रवानगी होणार- अंबिका सोनी - पक्ष संघटनेत रवानगी होणार- एम एस गिल - मंत्रिपद जाण्याची शक्यता- वीरप्पा मोईली - मंत्रिपद जाण्याची शक्यता- ज्योतिरादित्य शिंदे - जबाबदारी वाढणार- सचिन पायलट - जबाबदारी वाढणा- मनिष तिवारी - मंत्रिपद मिळण्याची शक्यता- जयंती नटराजन - मंत्रिपद मिळण्याची शक्यता- अभिषेक मनु सिंघवी - मंत्रिपद मिळण्याची शक्यता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2011 05:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close