S M L

शेतकर्‍यांच्या आत्महत्येत महाराष्ट्राचा पहिला नंबर !

रुपश्री नंदा, नवी दिल्ली18 जानेवारीगेल्या 13 वर्षांत भारतात जवळपास 2 लाख 50 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यात महाराष्ट्राचा पहिला नंबर आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो म्हणजेच एनएसआरबीच्या वार्षिक अहवालात ही बाब उघड झाली. - 2009 मध्ये 17 हजार हून अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. 2004 नंतरचा हा सर्वात मोठा आकडा होता. - 1997 पासून तब्बल 2 लाख 16 हजार 500 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या.पण हे आकडे यापेक्षा जास्त असू शकतात असं शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नाला समाजासमोर आणणारे द हिंदूचे संपादक पी साईनाथ यांचं मत आहे. हे आकडे सरकारच्या एनसीआरबीनं दिले आहेत. त्यांनी 1995 ते 2009 या दरम्यान 2,40,000 आत्महत्या झाल्याचं सांगितलं. पण ही आकडेवारी 2 लाख 40 हजार इतकी असायला हवी. त्यांची आकडेवारी कमी आहे. कारण त्यांनी आत्महत्या केलेल्या अनेकांना शेतकरी समजलंच नाही.सलग दहाव्या वर्षी शेतकर्‍यांच्या आत्महत्याग्रस्त राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. पंतप्रधानांच्या पॅकेजनंतरही महाराष्ट्रात 2 हजार 872 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांचा नंबर लागतो. याठिकाणी 2 तृत्यांश शेतकर्‍यांनी आपलं जीवन संपवलं. पण या वाढत्या आत्महत्यांचं कारण काय?इतर घटकांपेक्षा शेतकर्‍यांच्या आत्महत्येचं प्रमाण दुप्पट आहे. 1999-2000 या दरम्यान आत्महत्यांच्या प्रमाणात 15 टक्क्यांची वाढ झाली. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा आलेख वाढतोच आहे. गेल्या काही वर्षांत 28 पैकी 18 राज्यांमध्ये आत्महत्यांचं लोण पसरलं. 2007 मध्ये कृषीमंत्री शरद पवार यांनी राज्यसभेत लेखी उत्तर दिलं होतं. त्यात 1997 ते 2005 या दरम्यान 1 लाख 49 हजार पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर मात्र वाढलेल्या आकड्यांवर त्यांनी कधी प्रतिक्रिया दिली नाही. पॅकेज देऊनाही आत्महत्या थांबत नसल्यानं हा मुद्दा गंभीर बनला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2011 06:00 PM IST

शेतकर्‍यांच्या आत्महत्येत महाराष्ट्राचा पहिला नंबर !

रुपश्री नंदा, नवी दिल्ली

18 जानेवारी

गेल्या 13 वर्षांत भारतात जवळपास 2 लाख 50 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यात महाराष्ट्राचा पहिला नंबर आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो म्हणजेच एनएसआरबीच्या वार्षिक अहवालात ही बाब उघड झाली.

- 2009 मध्ये 17 हजार हून अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. 2004 नंतरचा हा सर्वात मोठा आकडा होता.

- 1997 पासून तब्बल 2 लाख 16 हजार 500 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या.

पण हे आकडे यापेक्षा जास्त असू शकतात असं शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नाला समाजासमोर आणणारे द हिंदूचे संपादक पी साईनाथ यांचं मत आहे. हे आकडे सरकारच्या एनसीआरबीनं दिले आहेत. त्यांनी 1995 ते 2009 या दरम्यान 2,40,000 आत्महत्या झाल्याचं सांगितलं. पण ही आकडेवारी 2 लाख 40 हजार इतकी असायला हवी. त्यांची आकडेवारी कमी आहे. कारण त्यांनी आत्महत्या केलेल्या अनेकांना शेतकरी समजलंच नाही.

सलग दहाव्या वर्षी शेतकर्‍यांच्या आत्महत्याग्रस्त राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. पंतप्रधानांच्या पॅकेजनंतरही महाराष्ट्रात 2 हजार 872 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांचा नंबर लागतो. याठिकाणी 2 तृत्यांश शेतकर्‍यांनी आपलं जीवन संपवलं.

पण या वाढत्या आत्महत्यांचं कारण काय?

इतर घटकांपेक्षा शेतकर्‍यांच्या आत्महत्येचं प्रमाण दुप्पट आहे. 1999-2000 या दरम्यान आत्महत्यांच्या प्रमाणात 15 टक्क्यांची वाढ झाली. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा आलेख वाढतोच आहे. गेल्या काही वर्षांत 28 पैकी 18 राज्यांमध्ये आत्महत्यांचं लोण पसरलं. 2007 मध्ये कृषीमंत्री शरद पवार यांनी राज्यसभेत लेखी उत्तर दिलं होतं. त्यात 1997 ते 2005 या दरम्यान 1 लाख 49 हजार पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर मात्र वाढलेल्या आकड्यांवर त्यांनी कधी प्रतिक्रिया दिली नाही. पॅकेज देऊनाही आत्महत्या थांबत नसल्यानं हा मुद्दा गंभीर बनला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2011 06:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close