S M L

स्वीस बँकेवरुन सरकार गप्प का ? कोर्टाचा सवाल

19 जानेवारीस्वीस बँकेतल्या भारतीयांच्या खात्यांवरून भाजप आणि सरकारमध्ये राजकीय संघर्ष पेटलाय स्वीस बँकेत खाती असणार्‍या भारतीयांची नावं सरकार जाणूनबुजून जाहीर करत नाही असा आरोप भाजपनं केला होता. त्याला पंतप्रधानांनी हे उत्तर दिलं. हा पैसा भारतात आणण्यासाठी तातडीचा कोणताच उपाय नाही असं पंतप्रधानांनी म्हटलं. दरम्यान सुप्रीम कोर्टानंही सरकारला फटकारलं आहे. काळा पैसा हा देशाच्या तिजोरीवरचा दरोडा आहे हा खूप मोठा गुन्हा आहे अशा कडक शब्दांत कोर्टानं सरकारवर ताशेरे ओढले. या मुद्द्यावर सरकार गप्प का असा सवालही कोर्टानं विचारला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 19, 2011 05:33 PM IST

स्वीस बँकेवरुन सरकार गप्प का ? कोर्टाचा सवाल

19 जानेवारी

स्वीस बँकेतल्या भारतीयांच्या खात्यांवरून भाजप आणि सरकारमध्ये राजकीय संघर्ष पेटलाय स्वीस बँकेत खाती असणार्‍या भारतीयांची नावं सरकार जाणूनबुजून जाहीर करत नाही असा आरोप भाजपनं केला होता. त्याला पंतप्रधानांनी हे उत्तर दिलं. हा पैसा भारतात आणण्यासाठी तातडीचा कोणताच उपाय नाही असं पंतप्रधानांनी म्हटलं. दरम्यान सुप्रीम कोर्टानंही सरकारला फटकारलं आहे. काळा पैसा हा देशाच्या तिजोरीवरचा दरोडा आहे हा खूप मोठा गुन्हा आहे अशा कडक शब्दांत कोर्टानं सरकारवर ताशेरे ओढले. या मुद्द्यावर सरकार गप्प का असा सवालही कोर्टानं विचारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 19, 2011 05:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close