S M L

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आरोपींची निर्दोष सुटका व्हावी !

20 जानेवारीमालेगाव आणि अजमेर स्फोटात हात असल्याचं दिसल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अभिनव भारतवर बंदी घालावी अशी मागणी मूव्हमेंट फॉर ह्यूमन वेलफेअर आणि बॉम्बे अमन कमिटी या संघटनांनी केली. आज आझाद मैदानात यासाठी या दोन्ही संघटनांनी मोर्चा काढला आणि निदर्शनं केली. यावेळी हैदराबादच्या मका मशिद स्फोटात आरोपी ठरवला गेलेला अब्दुल कलीमही हजर होता. आझाद मैदानात यावेळी मालेगाव, हैदराबाद आणि अजमेर येथूनही संस्थेचे कार्यकर्ते आले होते. देशभरातल्या बॉम्बस्फोटांचे तपास चुकीच्या पद्धतीने झाले आहेत. त्यांचा पुन्हा तपास करावा अशी मागणीही यावेळी केली गेली. मालेगांवच्या 2006 च्या स्फोटासाठी पकडल्या गेलेल्या आरोपींची तत्काळ सुटका करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 20, 2011 03:33 PM IST

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आरोपींची निर्दोष सुटका व्हावी !

20 जानेवारी

मालेगाव आणि अजमेर स्फोटात हात असल्याचं दिसल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अभिनव भारतवर बंदी घालावी अशी मागणी मूव्हमेंट फॉर ह्यूमन वेलफेअर आणि बॉम्बे अमन कमिटी या संघटनांनी केली. आज आझाद मैदानात यासाठी या दोन्ही संघटनांनी मोर्चा काढला आणि निदर्शनं केली. यावेळी हैदराबादच्या मका मशिद स्फोटात आरोपी ठरवला गेलेला अब्दुल कलीमही हजर होता. आझाद मैदानात यावेळी मालेगाव, हैदराबाद आणि अजमेर येथूनही संस्थेचे कार्यकर्ते आले होते. देशभरातल्या बॉम्बस्फोटांचे तपास चुकीच्या पद्धतीने झाले आहेत. त्यांचा पुन्हा तपास करावा अशी मागणीही यावेळी केली गेली. मालेगांवच्या 2006 च्या स्फोटासाठी पकडल्या गेलेल्या आरोपींची तत्काळ सुटका करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 20, 2011 03:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close