S M L

कर्नाटकचे मुख्यमंत्री-राज्यपाल यांच्यातला संघर्ष पेटला

22 जानेवारीकर्नाटकाचे राज्यपाल हंसराज भारद्वाज आणि मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्यातला संघर्ष तीव्र झालाय. काही झालं तरी आपण राजीनामा देणार नाही, असं येडियुरप्पा यांनी स्पष्ट केलंय. 'सध्याचे राज्यपाल काँग्रेस आणि जेडीएसचे एजन्ट आहेत. राजकीय आणि कायदेशीर लढाईसाठी मी तयार आहे.' असं ही त्यांनी म्हटलंय. भूखंड घोटाळ्याप्रकरणी येडियुरप्पा आणि गृहमंत्री के.अशोक यांच्याविरोधात खटला चालवायला भारद्वाज यांनी मंजुरी दिली. राज्यपालांच्या या निर्णयावर भाजपने कडाडून हल्ला केला. राज्यपाल हंसराज भारद्वाज घटनाबाह्य काम करत असून केंद्र सरकारनं त्यांना परत बोलवावं, अशी मागणी भाजपनं केली आहे. तर केंद्र सरकारनं राज्यपालांना परत बोलवावं, ही मागणी करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय नेते राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घेणार आहेत. भाजपचे प्रवक्ते राजीव प्रताप रुडी यांनी येडियुरप्पांना राजीनामा देण्याची गरज नाही, कर्नाटकची जनता त्यांच्यासोबत आहे असं म्हटलं आहे. तर राज्यपालांचा निर्णय योग्य असल्याचं कर्नाटकचे लोकायुक्त संतोष हेगडे यांनीही स्पष्ट केलंय. कर्नाटकच्या वादात आता केंद्रानंही उडी घेतली आहे. गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी राज्यपाल हंसराज भारद्वाज यांना पाठिंबा दिलाय. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय - 'केंद्र सरकारनं कर्नाटकातल्या घडामोडींची दखल घेतली आहे. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात खटला चालवण्यासाठी राज्यपालांनी परवानगी देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अशी मंजुरी देण्याचा राज्यपालांना अधिकार आहे, असं कर्नाटकचे लोकायुक्त संतोष हेगडे यांनीच म्हटलं होतं...'तर कायदामंत्री वीरप्पा मोईली यांनी भाजप भ्रष्टाचा-यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप केला आहे. येडियुरप्पा यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचं अहवालात स्पष्ट झालंय असंही म्हटलं आहे. या राजकीय नाट्याचे पडसाद कर्नाटक आणि राज्याबाहेरही उमटले. राज्यपालांच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी सत्ताधारी भाजपनेच शनिवारी कर्नाटक बंद पुकारला होता. बंदला पाठिंबा देऊन लोकांनी आपल्यावर विश्वास व्यक्त केल्याचं मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी म्हटलं. या बंद दरम्यान बंगळुरू, बेळगाव, म्हैसूर आणि धारवाडमध्ये हिंसाचाराच्या काही घटना घडल्या. बेळगावमध्ये अज्ञात लोकांनी 3 बस आणि 4 गाड्या फोडल्या. बंददरम्यान जवळपास 400 जणांना ताब्यात घेण्यात आलं. सिरीजन बाशा आणि के एन बलराज या वकिलांनी येडियुरप्पा यांच्याविरोधात कोर्टात 2 याचिका दाखल केल्या आहेत. या प्रकरणी सोमवारी आणखी दोन याचिका दाखल करण्यात येणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 22, 2011 04:16 PM IST

कर्नाटकचे मुख्यमंत्री-राज्यपाल यांच्यातला संघर्ष पेटला

22 जानेवारी

कर्नाटकाचे राज्यपाल हंसराज भारद्वाज आणि मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्यातला संघर्ष तीव्र झालाय. काही झालं तरी आपण राजीनामा देणार नाही, असं येडियुरप्पा यांनी स्पष्ट केलंय. 'सध्याचे राज्यपाल काँग्रेस आणि जेडीएसचे एजन्ट आहेत. राजकीय आणि कायदेशीर लढाईसाठी मी तयार आहे.' असं ही त्यांनी म्हटलंय.

भूखंड घोटाळ्याप्रकरणी येडियुरप्पा आणि गृहमंत्री के.अशोक यांच्याविरोधात खटला चालवायला भारद्वाज यांनी मंजुरी दिली. राज्यपालांच्या या निर्णयावर भाजपने कडाडून हल्ला केला. राज्यपाल हंसराज भारद्वाज घटनाबाह्य काम करत असून केंद्र सरकारनं त्यांना परत बोलवावं, अशी मागणी भाजपनं केली आहे. तर केंद्र सरकारनं राज्यपालांना परत बोलवावं, ही मागणी करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय नेते राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घेणार आहेत. भाजपचे प्रवक्ते राजीव प्रताप रुडी यांनी येडियुरप्पांना राजीनामा देण्याची गरज नाही, कर्नाटकची जनता त्यांच्यासोबत आहे असं म्हटलं आहे. तर राज्यपालांचा निर्णय योग्य असल्याचं कर्नाटकचे लोकायुक्त संतोष हेगडे यांनीही स्पष्ट केलंय.

कर्नाटकच्या वादात आता केंद्रानंही उडी घेतली आहे. गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी राज्यपाल हंसराज भारद्वाज यांना पाठिंबा दिलाय. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय - 'केंद्र सरकारनं कर्नाटकातल्या घडामोडींची दखल घेतली आहे. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात खटला चालवण्यासाठी राज्यपालांनी परवानगी देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अशी मंजुरी देण्याचा राज्यपालांना अधिकार आहे, असं कर्नाटकचे लोकायुक्त संतोष हेगडे यांनीच म्हटलं होतं...'

तर कायदामंत्री वीरप्पा मोईली यांनी भाजप भ्रष्टाचा-यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप केला आहे. येडियुरप्पा यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचं अहवालात स्पष्ट झालंय असंही म्हटलं आहे.

या राजकीय नाट्याचे पडसाद कर्नाटक आणि राज्याबाहेरही उमटले. राज्यपालांच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी सत्ताधारी भाजपनेच शनिवारी कर्नाटक बंद पुकारला होता. बंदला पाठिंबा देऊन लोकांनी आपल्यावर विश्वास व्यक्त केल्याचं मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी म्हटलं. या बंद दरम्यान बंगळुरू, बेळगाव, म्हैसूर आणि धारवाडमध्ये हिंसाचाराच्या काही घटना घडल्या. बेळगावमध्ये अज्ञात लोकांनी 3 बस आणि 4 गाड्या फोडल्या. बंददरम्यान जवळपास 400 जणांना ताब्यात घेण्यात आलं.

सिरीजन बाशा आणि के एन बलराज या वकिलांनी येडियुरप्पा यांच्याविरोधात कोर्टात 2 याचिका दाखल केल्या आहेत. या प्रकरणी सोमवारी आणखी दोन याचिका दाखल करण्यात येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 22, 2011 04:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close