S M L

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशींना अखेरचा निरोप

24 जानेवारीस्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना अखेरचा निरोप देण्यात आला. सरकारी इतमामात त्यांना मानवंदना देण्यात आली. पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीतल्या विद्युतदाहीनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या गुरुला अखेरचा निरोप देण्यासाठी पंडितजींचे शिष्य उपस्थित होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपतींचा शोकसंदेश काँग्रेसचे आमदार उल्हास पवार यांनी वाचून दाखवला. चाहत्यांच्या अलोट गर्दीत भीमसेन जोशींना अखेरचा निरोप देण्यात आला. पुण्यात सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी दीर्घ आजारानं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. ख्यालगायकीचे अनभिषिक्त सम्राट, संतवाणीचे वारकरी अशी त्यांची ओळख होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2011 11:40 AM IST

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशींना अखेरचा निरोप

24 जानेवारी

स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना अखेरचा निरोप देण्यात आला. सरकारी इतमामात त्यांना मानवंदना देण्यात आली. पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीतल्या विद्युतदाहीनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या गुरुला अखेरचा निरोप देण्यासाठी पंडितजींचे शिष्य उपस्थित होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपतींचा शोकसंदेश काँग्रेसचे आमदार उल्हास पवार यांनी वाचून दाखवला. चाहत्यांच्या अलोट गर्दीत भीमसेन जोशींना अखेरचा निरोप देण्यात आला. पुण्यात सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी दीर्घ आजारानं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. ख्यालगायकीचे अनभिषिक्त सम्राट, संतवाणीचे वारकरी अशी त्यांची ओळख होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2011 11:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close