S M L

भेसळखोरांनी अप्पर जिल्हाधिकार्‍यांना जिवंत जाळलं

25 जानेवारीप्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी लोकशाहीला आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना नाशिक जिल्ह्यातल्या मनमाडमध्ये घडली. नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना पेट्रोलच्या भेसळखोर माफियांनी जिवंत जाळलंय. या घटनेत अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कचरु सरवणकर ,पोपट शिंदे आणि राजू शिरसाट यांना तिघांना अटक करण्यात आली. सोनवणे हे गेली तीन वर्ष अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. याआधी त्यांनी नाशिकचे प्रांताधिकारी म्हणूनही काम पाहिलं. आज ते चांदवडहून नांदगावला तहसीलदारांच्या बैठकीसाठी जात होते. या प्रवासादरम्यान, मनमाड पासून 10 किलोमीटर अंतरावरच्या पानेवाडी शिवार इथल्या एका ढाब्यावर त्यांना काही टँकर्स दिसले. या संपूर्ण भागात मोठ्या संख्येने ऑईल टँक आणि ऑईल डेपो आहेत. इथं संशयित हालचाल वाटल्यामुळे या प्रकरणाची अधिक पाहणी करण्यासाठी सोनवणे तिथं गेले. पोपट शिंदे याचा हा ढाबा होता. आणि पोपट शिंदे हे पेट्रोल-डिझेल-रॉकेलच्या भेसळ रॅकेटमधला एक कुविख्यात गुंड म्हणून बदनाम आहे. सोनवणे जेव्हा पाहणी करण्यासाठी गेले तेव्हा पोपट शिंदे आणि त्याच्या सहा गुंडांनी सोनवणे यांच्यावर हल्ला केला. त्यांना ते ढाब्याच्या मागील शेतात घेऊन गेले. तिथं त्यांनी ज्वलनशील पदार्थ टाकून सोनवणे यांना पेटवून दिलं. सोनवणे हे अधिकृत रित्या धाड टाकण्यासाठी गेले नव्हते. त्यामुळे त्यांच्यासोबत पोलीस संरक्षण नव्हतं. त्यांच्यासोबत असलेला त्यांचा ड्रायव्हर आणि आणखी एका कर्मचार्‍याने सोनवणे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण ते यशस्वी झाले नाहीत. कर्तव्य बजावत असताना सोनवणे यांचा जळून जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पोपट शिंदे आणि त्याचे सहा गुंड फरार झाले. या सगळ्या प्रकारात पोपट शिंदे हा स्वत: सुद्धा 60 टक्के भाजला. पोपट शिंदे हा मालेगाव इथं एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेला होता. पण तिथं त्याला ऍडमिट करुन घेण्यात आलं नाही. त्याची रवानगी सिव्हील हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. तिथं त्याला पोलिसांनी अटकेत घेतलं. आणखी तीन आरोपी फरार आहेत. आरोपी पळून जाऊ नयेत यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये नाकाबंदी करण्यात आली.दरम्यान या घटने संदर्भात दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे नाशिकचे जिल्हाधिकारी पी. वेल्लारसू यांनी सांगितले. तर ही घटना माणुसकीला काळीम फासणारी आहे. हल्लेखोरांवर कडक कारवाई झालीच पाहिजे असे आदेश ही देण्यात आले आहे. 50 वर्षाच्या इतिहासात अशी घटना महाराष्ट्रात घडलेली नाही.अतिशय लाच्छनास्पद घटना आहे.या मागे असणारे रॅकेट उध्वस्त करु जर यांच्या मागे कुठल्याही पक्षाचे लोक असो यांना सोडणार नाही. माफियाना जशास तसे उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार दिली. तसेच हल्लेखोरांविरोधात मोक्का लावण्यात येईल असे आश्वासन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे. तर विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे म्हणाले की, या अगोदर ही अधिकार्‍यांना मारहाणीच्या घटना घडल्या आहे मात्र नुसतं आश्वसनाने काही होणार नाही कठोर कारवाई झाली पाहिजे तरचं सर्वसामान्य जनता सुरक्षित राहिलं. एकीकडे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हटलं जातं आहे सरकारने कठोर कारवाई करुन दाखवावी आणि विधानसभेत या कारवाईचा खुलासा द्यावा अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.जिल्हाधिकारी कार्यालयातल्या अधिकार्‍यांचं कामबंद आंदोलनसोनवणेंच्या हत्येचा निषेध करण्यासाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातल्या अधिकार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं. राज्यभरातल्या अधिकार्‍यांकडून सोनवणेंच्या हत्येचा निषेध करण्यात येत आहेत. राज्यभरातले अधिकारी या घटनेचा 26 जानेवारीनंतर मोठ्या प्रमाणावर निषेध करणार असल्याचे राजपत्रित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस ग. दि. कुल्थे यांनी बोलताना सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 25, 2011 12:32 PM IST

भेसळखोरांनी अप्पर जिल्हाधिकार्‍यांना जिवंत जाळलं

25 जानेवारी

प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी लोकशाहीला आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना नाशिक जिल्ह्यातल्या मनमाडमध्ये घडली. नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना पेट्रोलच्या भेसळखोर माफियांनी जिवंत जाळलंय. या घटनेत अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कचरु सरवणकर ,पोपट शिंदे आणि राजू शिरसाट यांना तिघांना अटक करण्यात आली. सोनवणे हे गेली तीन वर्ष अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. याआधी त्यांनी नाशिकचे प्रांताधिकारी म्हणूनही काम पाहिलं. आज ते चांदवडहून नांदगावला तहसीलदारांच्या बैठकीसाठी जात होते. या प्रवासादरम्यान, मनमाड पासून 10 किलोमीटर अंतरावरच्या पानेवाडी शिवार इथल्या एका ढाब्यावर त्यांना काही टँकर्स दिसले. या संपूर्ण भागात मोठ्या संख्येने ऑईल टँक आणि ऑईल डेपो आहेत. इथं संशयित हालचाल वाटल्यामुळे या प्रकरणाची अधिक पाहणी करण्यासाठी सोनवणे तिथं गेले. पोपट शिंदे याचा हा ढाबा होता. आणि पोपट शिंदे हे पेट्रोल-डिझेल-रॉकेलच्या भेसळ रॅकेटमधला एक कुविख्यात गुंड म्हणून बदनाम आहे. सोनवणे जेव्हा पाहणी करण्यासाठी गेले तेव्हा पोपट शिंदे आणि त्याच्या सहा गुंडांनी सोनवणे यांच्यावर हल्ला केला. त्यांना ते ढाब्याच्या मागील शेतात घेऊन गेले. तिथं त्यांनी ज्वलनशील पदार्थ टाकून सोनवणे यांना पेटवून दिलं. सोनवणे हे अधिकृत रित्या धाड टाकण्यासाठी गेले नव्हते. त्यामुळे त्यांच्यासोबत पोलीस संरक्षण नव्हतं. त्यांच्यासोबत असलेला त्यांचा ड्रायव्हर आणि आणखी एका कर्मचार्‍याने सोनवणे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण ते यशस्वी झाले नाहीत. कर्तव्य बजावत असताना सोनवणे यांचा जळून जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पोपट शिंदे आणि त्याचे सहा गुंड फरार झाले. या सगळ्या प्रकारात पोपट शिंदे हा स्वत: सुद्धा 60 टक्के भाजला. पोपट शिंदे हा मालेगाव इथं एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेला होता. पण तिथं त्याला ऍडमिट करुन घेण्यात आलं नाही. त्याची रवानगी सिव्हील हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. तिथं त्याला पोलिसांनी अटकेत घेतलं. आणखी तीन आरोपी फरार आहेत. आरोपी पळून जाऊ नयेत यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये नाकाबंदी करण्यात आली.

दरम्यान या घटने संदर्भात दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे नाशिकचे जिल्हाधिकारी पी. वेल्लारसू यांनी सांगितले. तर ही घटना माणुसकीला काळीम फासणारी आहे. हल्लेखोरांवर कडक कारवाई झालीच पाहिजे असे आदेश ही देण्यात आले आहे. 50 वर्षाच्या इतिहासात अशी घटना महाराष्ट्रात घडलेली नाही.अतिशय लाच्छनास्पद घटना आहे.या मागे असणारे रॅकेट उध्वस्त करु जर यांच्या मागे कुठल्याही पक्षाचे लोक असो यांना सोडणार नाही. माफियाना जशास तसे उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार दिली. तसेच हल्लेखोरांविरोधात मोक्का लावण्यात येईल असे आश्वासन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे. तर विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे म्हणाले की, या अगोदर ही अधिकार्‍यांना मारहाणीच्या घटना घडल्या आहे मात्र नुसतं आश्वसनाने काही होणार नाही कठोर कारवाई झाली पाहिजे तरचं सर्वसामान्य जनता सुरक्षित राहिलं. एकीकडे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हटलं जातं आहे सरकारने कठोर कारवाई करुन दाखवावी आणि विधानसभेत या कारवाईचा खुलासा द्यावा अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातल्या अधिकार्‍यांचं कामबंद आंदोलन

सोनवणेंच्या हत्येचा निषेध करण्यासाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातल्या अधिकार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं. राज्यभरातल्या अधिकार्‍यांकडून सोनवणेंच्या हत्येचा निषेध करण्यात येत आहेत. राज्यभरातले अधिकारी या घटनेचा 26 जानेवारीनंतर मोठ्या प्रमाणावर निषेध करणार असल्याचे राजपत्रित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस ग. दि. कुल्थे यांनी बोलताना सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 25, 2011 12:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close