S M L

भेसळ रोखण्यासाठी नवं धोरण राबवणार - रेड्डी

27 जानेवारीभेसळ रोखण्यासाठी येत्या 6 महिन्यांत उपाययोजना राबवणार असं आश्वासन पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डी यांनी दिलं. यशवंत सोनावणे यांची हत्या हे घृणास्पद कृत्य असल्याची टीकाही त्यांनी केली. या हत्येनंतर देशभरातली पेट्रोल भेसळ कशी रोखता येईल यासाठी रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये पेट्रोल भेसळ रोखण्यासाठी येत्या 6 महिन्यांत नवं धोरण राबवलं जाईल असंही त्यांनी सांगितलं. पेट्रोल भेसळ रोखण्यासाठी तीन महत्वाच्या उपाययोजना राबवल्या जाणार आहेत.यामध्ये 6 महिन्यांत नविन मार्केर सिस्टिम आणणं, केरोसिन टँकरवर जीपीएस बसवणं तसेच यासंबंधीचे सर्व व्यवहार ऑनलाईन करणार असल्याचं सांगितलं.तसेच ऑईल कंपन्यांकडून सोनावणे यांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत दिली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 27, 2011 10:14 AM IST

भेसळ रोखण्यासाठी नवं धोरण राबवणार - रेड्डी

27 जानेवारी

भेसळ रोखण्यासाठी येत्या 6 महिन्यांत उपाययोजना राबवणार असं आश्वासन पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डी यांनी दिलं. यशवंत सोनावणे यांची हत्या हे घृणास्पद कृत्य असल्याची टीकाही त्यांनी केली. या हत्येनंतर देशभरातली पेट्रोल भेसळ कशी रोखता येईल यासाठी रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये पेट्रोल भेसळ रोखण्यासाठी येत्या 6 महिन्यांत नवं धोरण राबवलं जाईल असंही त्यांनी सांगितलं. पेट्रोल भेसळ रोखण्यासाठी तीन महत्वाच्या उपाययोजना राबवल्या जाणार आहेत.यामध्ये 6 महिन्यांत नविन मार्केर सिस्टिम आणणं, केरोसिन टँकरवर जीपीएस बसवणं तसेच यासंबंधीचे सर्व व्यवहार ऑनलाईन करणार असल्याचं सांगितलं.तसेच ऑईल कंपन्यांकडून सोनावणे यांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत दिली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 27, 2011 10:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close