S M L

अमोल पालेकर आणि माशेलकर यांना महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे पुरस्कार

27 जानेवारीमहाराष्ट्र फाऊंडेशनआणि साधनातर्फे देण्यात येणार्‍या साहित्य आणि सामाजिक पुरस्कारांचं वितरण पुण्यात करण्यात आलं. अमोल पालेकर आणि रघुनाथ माशेलकर यांनी पुरस्कारांचं वितरण केलं. अमेरिकेत स्थायिक झालेल्या महाराष्ट्रीय व्यक्तींनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे 1994 पासून साहित्य क्षेत्रात तर 1996 पासून समाजकार्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार नागनाथ अण्णा नायकवडी यांना दिला. विशेष पुरस्कार चंद्रकांत केळकर यांना प्रबोधन कार्यकर्ता पुरस्कार सत्यपाल महाराज यांना असंघटीत कष्टकरी कार्यकर्ता पुरस्कार बस्तू रेगे यांना सामाजिक प्रश्न पुरस्काराकर्ता हरीश सदानी युवा कार्यकर्ता पुरस्कारासाठी नीलेश नीमकर यांना लक्षवेधी प्रशासकीय कार्य पुरस्कार लक्ष्मीकांत देशमुख यांना देण्यात आला. साहित्य जीवनगौरव पुरस्कार अरूण टिकेकर दगडावरच्या पेरणीकरता विशेष ग्रंथ पुरस्कार सय्यदभाई यांना, वैचारिक ग्रंथ पुरस्कार साम्राज्यवाद विरोध आणि जातीविनाश करता आनंद तेलतुंबडे, अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार आणि दोन हात करता वि.ना. श्रीखंडे ललित ग्रंथ पुरस्कार रिबोट करता जी.के. ऐनापुरे तर रा.शं दातार नाट्य पुरस्कार आनंदभोग मॉल करता आशुतोष पोतदार यांना देण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 27, 2011 12:15 PM IST

अमोल पालेकर आणि माशेलकर यांना महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे पुरस्कार

27 जानेवारी

महाराष्ट्र फाऊंडेशनआणि साधनातर्फे देण्यात येणार्‍या साहित्य आणि सामाजिक पुरस्कारांचं वितरण पुण्यात करण्यात आलं. अमोल पालेकर आणि रघुनाथ माशेलकर यांनी पुरस्कारांचं वितरण केलं. अमेरिकेत स्थायिक झालेल्या महाराष्ट्रीय व्यक्तींनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे 1994 पासून साहित्य क्षेत्रात तर 1996 पासून समाजकार्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार नागनाथ अण्णा नायकवडी यांना दिला. विशेष पुरस्कार चंद्रकांत केळकर यांना प्रबोधन कार्यकर्ता पुरस्कार सत्यपाल महाराज यांना असंघटीत कष्टकरी कार्यकर्ता पुरस्कार बस्तू रेगे यांना सामाजिक प्रश्न पुरस्काराकर्ता हरीश सदानी युवा कार्यकर्ता पुरस्कारासाठी नीलेश नीमकर यांना लक्षवेधी प्रशासकीय कार्य पुरस्कार लक्ष्मीकांत देशमुख यांना देण्यात आला. साहित्य जीवनगौरव पुरस्कार अरूण टिकेकर दगडावरच्या पेरणीकरता विशेष ग्रंथ पुरस्कार सय्यदभाई यांना, वैचारिक ग्रंथ पुरस्कार साम्राज्यवाद विरोध आणि जातीविनाश करता आनंद तेलतुंबडे, अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार आणि दोन हात करता वि.ना. श्रीखंडे ललित ग्रंथ पुरस्कार रिबोट करता जी.के. ऐनापुरे तर रा.शं दातार नाट्य पुरस्कार आनंदभोग मॉल करता आशुतोष पोतदार यांना देण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 27, 2011 12:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close