S M L

काळ्या पैशावरुन सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला फटकारलं

27 जानेवारीकाळ्या पैशाच्या मुद्यावर सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला फटकारलं. याबाबतच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टानं फटकारलं. काळा पैसा जमा करणार्‍यांची नावं गुप्त का ठेवली अशी विचारणा कोर्टानं केली. काळ्या पैशाचा मागे कोण आहे. तसेच सरकारने कायदेशीर कारवाईची तयारी का केली नाही असा सवाल न्यायालयानं केला. काळ्या पैशाच्या मुद्यावर केंद्र सरकार आज सुप्रीम कोर्टात बाजू मांडत आहे. काही भारतीयांनी परदेशात बँकांमध्ये दडवलेल्या अब्जावधी रुपयांची माहिती केंद्र सरकार का जाहीर करु शकत नाही असा सवाल गेल्या सुनावणीत कोर्टानं केला होता. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्राची भूमिका स्पष्ट केली होती. परदेशात काळा पैसा साठवणार्‍यांची यादी जाहीर करण्याची इच्छा आहे. पण गोपनीयतेच्या करारामुळे अडचण निर्माण झाल्याचं मुखर्जी यांनी सांगितलं होतं. हा मुद्दा भाजपने उचलून धरला होता. त्यावर आज न्यायालयात सरकार भूमिका मांडत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 27, 2011 12:20 PM IST

काळ्या पैशावरुन सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला फटकारलं

27 जानेवारी

काळ्या पैशाच्या मुद्यावर सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला फटकारलं. याबाबतच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टानं फटकारलं. काळा पैसा जमा करणार्‍यांची नावं गुप्त का ठेवली अशी विचारणा कोर्टानं केली. काळ्या पैशाचा मागे कोण आहे. तसेच सरकारने कायदेशीर कारवाईची तयारी का केली नाही असा सवाल न्यायालयानं केला. काळ्या पैशाच्या मुद्यावर केंद्र सरकार आज सुप्रीम कोर्टात बाजू मांडत आहे. काही भारतीयांनी परदेशात बँकांमध्ये दडवलेल्या अब्जावधी रुपयांची माहिती केंद्र सरकार का जाहीर करु शकत नाही असा सवाल गेल्या सुनावणीत कोर्टानं केला होता. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्राची भूमिका स्पष्ट केली होती. परदेशात काळा पैसा साठवणार्‍यांची यादी जाहीर करण्याची इच्छा आहे. पण गोपनीयतेच्या करारामुळे अडचण निर्माण झाल्याचं मुखर्जी यांनी सांगितलं होतं. हा मुद्दा भाजपने उचलून धरला होता. त्यावर आज न्यायालयात सरकार भूमिका मांडत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 27, 2011 12:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close