S M L

सीबीआयकडून एफआयआर दाखल; अशोक चव्हाण आरोपी नाही

29 जानेवारीआदर्श घोटाळ्या प्रकरणी सीबीआयनं एफआयआर दाखल केलं. या एफआयआरमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव आहे. पण अशोक चव्हाण यांना आरोपी बनवण्यात आलेलं नाही. त्याच्यांसह आदर्श सोसायटीचे प्रमोटर आर.सी. ठाकूर, कन्हैयालाल गिडवाणी,आदर्श सोसायटीचे अध्यक्ष निवृत्त ब्रिगेडियर एम.एम. वांच्छू आणि आयएएस अधिकारी प्रदीप व्यास यांच्यासह 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेत. सीबीआयनं आज सेशन कोर्टात एफआयआर दाखल केलं.आदर्श प्रकरणात अनेक सनदी अधिकारी आणि राजकारण्यांचं संगनमत असल्याचं स्पष्ट झालं. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले होते. यात एक माजी जनरल आणि ब्रिगेडियर रँक दर्जाच्या अधिकार्‍यांसह राज्यातल्या काही आजी - माजी सनदी अधिकार्‍यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सीबीआयने एफआयआरची प्रत मुंबई हायकोर्टात सादर करण्यात येणार आहे.येत्या मंगळवारी या प्रकरणी सुनावणी आहे. त्यावेळी सीबीआयकडून एफआयआरची प्रत हायकोर्टात सादर केली जाणार आहे. या एफआआर मधला तपशील जाहीर झाल्यावर अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2011 09:25 AM IST

सीबीआयकडून एफआयआर दाखल; अशोक चव्हाण आरोपी नाही

29 जानेवारी

आदर्श घोटाळ्या प्रकरणी सीबीआयनं एफआयआर दाखल केलं. या एफआयआरमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव आहे. पण अशोक चव्हाण यांना आरोपी बनवण्यात आलेलं नाही. त्याच्यांसह आदर्श सोसायटीचे प्रमोटर आर.सी. ठाकूर, कन्हैयालाल गिडवाणी,आदर्श सोसायटीचे अध्यक्ष निवृत्त ब्रिगेडियर एम.एम. वांच्छू आणि आयएएस अधिकारी प्रदीप व्यास यांच्यासह 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेत. सीबीआयनं आज सेशन कोर्टात एफआयआर दाखल केलं.

आदर्श प्रकरणात अनेक सनदी अधिकारी आणि राजकारण्यांचं संगनमत असल्याचं स्पष्ट झालं. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले होते. यात एक माजी जनरल आणि ब्रिगेडियर रँक दर्जाच्या अधिकार्‍यांसह राज्यातल्या काही आजी - माजी सनदी अधिकार्‍यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सीबीआयने एफआयआरची प्रत मुंबई हायकोर्टात सादर करण्यात येणार आहे.येत्या मंगळवारी या प्रकरणी सुनावणी आहे. त्यावेळी सीबीआयकडून एफआयआरची प्रत हायकोर्टात सादर केली जाणार आहे. या एफआआर मधला तपशील जाहीर झाल्यावर अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2011 09:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close