S M L

'स्टार प्लस'वर 'सासू रिटायर होतेय'

4 नोव्हेंबर, मुंबईसोनाली देशपांडे गेली आठ वर्षं स्टार प्लसवर सुरू असलेली 'सांस भी कभी बहू थी' मालिका येत्या 10 नोव्हेंबरला संपणार आहे. ही मालिका 'स्टार'नं बालाजी टेलिफिल्मला बंद करायला सांगितल्यावर बालाजी टेलिफिल्म्सनं कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टानं निकाल 'स्टार'च्या बाजूनंच दिला. त्यामुळे 'क्युंकी सांस भी कभी बहू थी'ला आता निरोप घ्यावा लागत आहे. ही मालिका सुरू झाली, तेव्हा तिचा टीआरपी 15 होता. आता रिअ‍ॅलिटी शोच्या गर्दीत सांसबहूच्या मालिका मागे पडत आहेत. त्यामुळे 'सांस भी..'चा टीआरपी 3. 39वर पोहोचला आहे.'कहानी घर घर की' मालिका बंद झाल्यानंतर 'सांस भी कभी बहू थी' बंद पडली. बालाजी प्रॉडक्शनची 'सांस भी कभी बहू थी', सुरू झाली तेव्हा साल होतं 2000. कमी कालावधीत ही मालिका लोकप्रिय झाली. त्यातली तुलसी घराघरांत पोचली. स्टार ग्रुपच्याच एसजीएल एण्टरटेन्मेण्ट लि.ने या मालिकेला टर्मिनेशनची नोटीस पाठवली आहे.बालाजीच्या म्हणण्याप्रमाणे हा कराराचाच एक भाग आहे. बालाजीचे स्टार ग्रुपसाठी सहा प्रोग्राम्स सुरू आहेत. पण 'क्युंकि सांस भी कभी बहू थी'चा सध्याचा टीआरपी चांगलाच घसरलाय. तो 3.39झाला आहे. त्यामुळे ती आटोपती घ्यावी,'असं स्टारचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 4, 2008 08:52 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2008 08:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close