S M L

शास्त्रीय गायक श्रीकांत देशपांडे यांचं निधन

29 जानेवारीशास्त्रीय गायक श्रीकांत देशपांडे यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. पंडित भिमसेन जोशी यांचे ते शिष्य होते. सवाई गंधर्वांचे ते नातूही होते. किराणा घराण्याची परंपरा त्यांनी नेहमीच जपली. त्यांनी आपली गायकी बहरवली ती किराणा घराण्यात. सरस्वतीबाई राणे यांच्याकडे त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. सरस्वतीबाई राणेंबरोबरच पंडित भीमसेन जोशी, पंडित फिरोज दस्तूर हे दोन दिग्गज गायकही त्यांना गुरू म्हणून लाभले. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातल्या एका खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल दुपारनंतर त्यांची तब्येत अचानक ढासळली आणि आज सकाळी त्यांचं निधन झालं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2011 11:24 AM IST

शास्त्रीय गायक श्रीकांत देशपांडे यांचं निधन

29 जानेवारी

शास्त्रीय गायक श्रीकांत देशपांडे यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. पंडित भिमसेन जोशी यांचे ते शिष्य होते. सवाई गंधर्वांचे ते नातूही होते. किराणा घराण्याची परंपरा त्यांनी नेहमीच जपली. त्यांनी आपली गायकी बहरवली ती किराणा घराण्यात. सरस्वतीबाई राणे यांच्याकडे त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. सरस्वतीबाई राणेंबरोबरच पंडित भीमसेन जोशी, पंडित फिरोज दस्तूर हे दोन दिग्गज गायकही त्यांना गुरू म्हणून लाभले. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातल्या एका खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल दुपारनंतर त्यांची तब्येत अचानक ढासळली आणि आज सकाळी त्यांचं निधन झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2011 11:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close