S M L

इजिप्तमध्ये आंदोलनात 110 नागरिकांचा मृत्यू

29 जानेवारीइजिप्तमध्ये सध्या होस्ने मुबारक यांना हटवण्यासाठी जोरदार आंदोलन सुरु आहे. गेली 30 वर्ष इजिप्तचे अध्यक्ष असणारे होस्नी मुबारक यांच्या विरोधात जनतेनं उठाव केला. अध्यक्षांचा निषेध करण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहे. या जमावानं अनेक सरकारी इमारती पेटवून दिल्या आणि ताहिर चौकात निदर्शनं केली. त्यामुळे इजिप्तची लष्करी दलं आता रस्त्यावर उतरून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अध्यक्ष होस्नी मुबारक यांनी आपलं सरकार बरखास्त केलं. पण त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. मुबारक यांच्या संरक्षणार्थ आता इजिप्तचं लष्कर रस्त्यावर उतरलंय. ट्युनिशिया, जॉर्डन आणि येमेनमध्येही अशाच प्रकारचा उठाव झाला होता. दरम्यान इजिप्तची राजधानी कैरोमध्ये बंद करण्यात आलेली मोबाईल सेवा सुरू करण्यात आली. पण इंटरनेटवरची बंदी मात्र कायम आहे. इजिप्तमधले पिरॅमिड्सही पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. सर्व बँकाही आज बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान, देशात सुरु असलेल्या सरकारविरुद्धच्या आंदोलनात जवळपास 110 निदर्शक ठार झाले आहेत. राजधानी कैरोमध्ये आतापर्यंत 41 मृतदेह सापडले आहे. तर सुवेझ शहरात 38, अँलेक्झांड्रिया शहरात 36 आंदोलकांचे मृतदेह मिळाले. सरकारी कार्यालयात घुसताना अनेक ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. यामध्ये हे मृत्यू झाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2011 04:35 PM IST

इजिप्तमध्ये आंदोलनात 110 नागरिकांचा मृत्यू

29 जानेवारी

इजिप्तमध्ये सध्या होस्ने मुबारक यांना हटवण्यासाठी जोरदार आंदोलन सुरु आहे. गेली 30 वर्ष इजिप्तचे अध्यक्ष असणारे होस्नी मुबारक यांच्या विरोधात जनतेनं उठाव केला. अध्यक्षांचा निषेध करण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहे. या जमावानं अनेक सरकारी इमारती पेटवून दिल्या आणि ताहिर चौकात निदर्शनं केली. त्यामुळे इजिप्तची लष्करी दलं आता रस्त्यावर उतरून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अध्यक्ष होस्नी मुबारक यांनी आपलं सरकार बरखास्त केलं. पण त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. मुबारक यांच्या संरक्षणार्थ आता इजिप्तचं लष्कर रस्त्यावर उतरलंय. ट्युनिशिया, जॉर्डन आणि येमेनमध्येही अशाच प्रकारचा उठाव झाला होता. दरम्यान इजिप्तची राजधानी कैरोमध्ये बंद करण्यात आलेली मोबाईल सेवा सुरू करण्यात आली. पण इंटरनेटवरची बंदी मात्र कायम आहे. इजिप्तमधले पिरॅमिड्सही पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. सर्व बँकाही आज बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान, देशात सुरु असलेल्या सरकारविरुद्धच्या आंदोलनात जवळपास 110 निदर्शक ठार झाले आहेत. राजधानी कैरोमध्ये आतापर्यंत 41 मृतदेह सापडले आहे. तर सुवेझ शहरात 38, अँलेक्झांड्रिया शहरात 36 आंदोलकांचे मृतदेह मिळाले. सरकारी कार्यालयात घुसताना अनेक ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. यामध्ये हे मृत्यू झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2011 04:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close