S M L

आदर्श प्रकरणी दुसर्‍या दिवशीही सीबीआयची चौकशी सुरू

31 जानेवारीदुसर्‍या दिवशीही सीबीआयनं आदर्श प्रकरणी चौकशी सुरुच ठेवली आहे. काल रविवारपासूनच सीबीआयची टीम आदर्शच्या ऑफिसमध्ये आहे. गेले 24 तास ही टीम कागदपत्रांची छाननी करत आहे. सीबीआयनं काल 7 शहरांमध्ये छापे टाकले होते. आदर्शच्या ऑफिसवर आणि प्रमोटर्सच्या घरांवर असे 10 ठिकाणी सीबीआयनं छापे टाकले.त्याआधी सीबीआयनं एफआयआर दाखल केला होता. यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह 13 जणांना आरोपी करण्यात आलं होतं. सीबीआयच्या 4 जणांच्या टीमनं ही कारवाई केली. यात प्रमोटर कन्हैयालाल गिडवाणी, आर. सी. ठाकूर तसेच आदर्शचे अध्यक्ष एम. एम. वांच्छू यांच्या घरावर सीबीआयनं छापे टाकले आहेत. कन्हैयालाल गिडवाणी यांच्या पुण्यातल्या दोन घरांवर आणि ऑफिसवरही छापे टाकण्यात आलेत. तर आर. सी ठाकूर यांच्या ठाणे, नागपूर आणि बिहारमधल्या पाटणा इथल्या घरांवर छापे टाकण्यात आले. ठाकूर यांच्या ठाण्यातल्या रोनक पार्क इथल्या घरावर काल सकाळी 7 वाजता सीबीआयनं छापा टाकला. तर वांच्छू यांच्या पुण्यातल्या साळूंखे विहारमध्येही सीबीआयनं छापा टाकला. तर संध्याकाळी राज्याचे निलंबित माहिती आयुक्त रामानंद तिवारी यांच्या घरावर सीबीआयनं छापा टाकला. त्याबरोबरच निवृत्त उपसचिव पी.व्ही.देशमुख यांच्या ठाण्यातील घरावही छापा टाकण्यात आला.दरम्यान, आदर्शचे चीफ प्रमोटर आर. सी . ठाकूर यांच्या नागपुरातल्या धरमपेठ भागात असलेल्या सिध्दीविनायक अपार्टमेंटच्या फ्लॅटची सीबीआय अधिका-यांनी सकाळपासून झडती सुरू केली. हा फ्लॅट ठाकूर यांनी 13 वर्षापूर्वी खरेदी केला होता. इथे असलेल्या कागद पत्रांची तपासणी करण्यासाठी सीबीआय ची टीम अनेक तासांपासून इथं तळ ठोकून आहेत. त्यामुळे आर.सी.ठाकूर यांच्या या फ्लॅटमधून काय कागदपत्र मिळतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 31, 2011 08:42 AM IST

आदर्श प्रकरणी दुसर्‍या दिवशीही सीबीआयची चौकशी सुरू

31 जानेवारी

दुसर्‍या दिवशीही सीबीआयनं आदर्श प्रकरणी चौकशी सुरुच ठेवली आहे. काल रविवारपासूनच सीबीआयची टीम आदर्शच्या ऑफिसमध्ये आहे. गेले 24 तास ही टीम कागदपत्रांची छाननी करत आहे. सीबीआयनं काल 7 शहरांमध्ये छापे टाकले होते. आदर्शच्या ऑफिसवर आणि प्रमोटर्सच्या घरांवर असे 10 ठिकाणी सीबीआयनं छापे टाकले.त्याआधी सीबीआयनं एफआयआर दाखल केला होता. यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह 13 जणांना आरोपी करण्यात आलं होतं.

सीबीआयच्या 4 जणांच्या टीमनं ही कारवाई केली. यात प्रमोटर कन्हैयालाल गिडवाणी, आर. सी. ठाकूर तसेच आदर्शचे अध्यक्ष एम. एम. वांच्छू यांच्या घरावर सीबीआयनं छापे टाकले आहेत. कन्हैयालाल गिडवाणी यांच्या पुण्यातल्या दोन घरांवर आणि ऑफिसवरही छापे टाकण्यात आलेत. तर आर. सी ठाकूर यांच्या ठाणे, नागपूर आणि बिहारमधल्या पाटणा इथल्या घरांवर छापे टाकण्यात आले. ठाकूर यांच्या ठाण्यातल्या रोनक पार्क इथल्या घरावर काल सकाळी 7 वाजता सीबीआयनं छापा टाकला. तर वांच्छू यांच्या पुण्यातल्या साळूंखे विहारमध्येही सीबीआयनं छापा टाकला. तर संध्याकाळी राज्याचे निलंबित माहिती आयुक्त रामानंद तिवारी यांच्या घरावर सीबीआयनं छापा टाकला. त्याबरोबरच निवृत्त उपसचिव पी.व्ही.देशमुख यांच्या ठाण्यातील घरावही छापा टाकण्यात आला.

दरम्यान, आदर्शचे चीफ प्रमोटर आर. सी . ठाकूर यांच्या नागपुरातल्या धरमपेठ भागात असलेल्या सिध्दीविनायक अपार्टमेंटच्या फ्लॅटची सीबीआय अधिका-यांनी सकाळपासून झडती सुरू केली. हा फ्लॅट ठाकूर यांनी 13 वर्षापूर्वी खरेदी केला होता. इथे असलेल्या कागद पत्रांची तपासणी करण्यासाठी सीबीआय ची टीम अनेक तासांपासून इथं तळ ठोकून आहेत. त्यामुळे आर.सी.ठाकूर यांच्या या फ्लॅटमधून काय कागदपत्र मिळतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 31, 2011 08:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close