S M L

ईडन गार्डन मैदानामुळे भारत - इंग्लंड मॅच अखेर रद्द

31 जानेवारीकोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानाने भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यानची वन डे मॅच अखेर रद्द झाली आहे. ही मॅच आता बंगळुरुमध्ये खेळवण्याचा निर्णय आयसीसीनं घेतला आहे. आणि एका आठवड्याच्या आत नुतनीकरणाचं काम पूर्ण केलं नाही तर उरलेल्या तीन मॅचही त्यांच्या हातातून जातील असा थेट इशारा आयसीसीने बंगाल क्रिकेट असोसिएशनला दिला आहे. जगमोहन दालमिया यांच्या कारकिर्दीला लागलेला हा काळा डाग आहे. वर्ल्ड कप मायदेशात होत असताना दालमिया यांचा मात्र क्रिकेट प्रशासक म्हणून पराभव झाला आहे. भारत - इंग्लंड दरम्यानची वर्ल्ड कप मॅच आता ईडनवर होणार नाही हे लक्षात आल्यावर स्वत: दालमियांनाही रविवारी बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. आयसीसी अध्यक्ष आणि बीसीसीआय अधिकार्‍यांनी महत्त्वाच्या क्षणी पाठ फिरवली अशी प्रतिक्रिया अखेर त्यांनी दिली. दालमिया यांच्या आरोपाला पवारांनी मात्र थेट उत्तर दिलं नाही. त्यांनी उत्तर दिलं प्रशासकीय भाषेतच.भारत विरुद्ध इंग्लंड सारखी महत्त्वाची मॅच हातातून जाऊ नये म्हणून बंगाल क्रिकेट असोसिएशनने शेवटपर्यंत प्रयत्न केले. बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनीही मध्यस्थी केली. पण ईडन गार्डन स्टेडिअमची सध्याची ही अवस्था विसरता येणार नव्हती. आणि अखेर आयसीसीने मॅच हटवण्याचा आपला निर्णय कायम ठेवला. ईडन गार्डनवर यापूर्वी वर्ल्ड कप सेमी फायनल आणि फायनलही पार पडली आहे. त्यामुळे बंगाल असोसिएशनला हे दु:ख पचवणं कठीण आहे. पण एक धडाही त्यांना घेण्यासारखा आहे. स्टेडिअमचं नुतनीकरण वेळेत झालं नाही तर उरलेल्या तीन मॅचही त्यांना मुकाव्या लागतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 31, 2011 11:52 AM IST

ईडन गार्डन मैदानामुळे भारत - इंग्लंड मॅच अखेर रद्द

31 जानेवारी

कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानाने भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यानची वन डे मॅच अखेर रद्द झाली आहे. ही मॅच आता बंगळुरुमध्ये खेळवण्याचा निर्णय आयसीसीनं घेतला आहे. आणि एका आठवड्याच्या आत नुतनीकरणाचं काम पूर्ण केलं नाही तर उरलेल्या तीन मॅचही त्यांच्या हातातून जातील असा थेट इशारा आयसीसीने बंगाल क्रिकेट असोसिएशनला दिला आहे.

जगमोहन दालमिया यांच्या कारकिर्दीला लागलेला हा काळा डाग आहे. वर्ल्ड कप मायदेशात होत असताना दालमिया यांचा मात्र क्रिकेट प्रशासक म्हणून पराभव झाला आहे. भारत - इंग्लंड दरम्यानची वर्ल्ड कप मॅच आता ईडनवर होणार नाही हे लक्षात आल्यावर स्वत: दालमियांनाही रविवारी बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. आयसीसी अध्यक्ष आणि बीसीसीआय अधिकार्‍यांनी महत्त्वाच्या क्षणी पाठ फिरवली अशी प्रतिक्रिया अखेर त्यांनी दिली.

दालमिया यांच्या आरोपाला पवारांनी मात्र थेट उत्तर दिलं नाही. त्यांनी उत्तर दिलं प्रशासकीय भाषेतच.भारत विरुद्ध इंग्लंड सारखी महत्त्वाची मॅच हातातून जाऊ नये म्हणून बंगाल क्रिकेट असोसिएशनने शेवटपर्यंत प्रयत्न केले. बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनीही मध्यस्थी केली. पण ईडन गार्डन स्टेडिअमची सध्याची ही अवस्था विसरता येणार नव्हती. आणि अखेर आयसीसीने मॅच हटवण्याचा आपला निर्णय कायम ठेवला.

ईडन गार्डनवर यापूर्वी वर्ल्ड कप सेमी फायनल आणि फायनलही पार पडली आहे. त्यामुळे बंगाल असोसिएशनला हे दु:ख पचवणं कठीण आहे. पण एक धडाही त्यांना घेण्यासारखा आहे. स्टेडिअमचं नुतनीकरण वेळेत झालं नाही तर उरलेल्या तीन मॅचही त्यांना मुकाव्या लागतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 31, 2011 11:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close