S M L

जळगावमध्ये अवैध वाळू उपसा प्रकरणी 2 जण निलंबित

01 फेब्रुवारीजळगावमधील अवैध वाळू उपसा प्रकरणी आता जिल्हाधिकार्‍यांनी सर्कल ऑफिसर एम.एस.पठाण आणि तलाठी एस. पी. पाटील यांना निलंबित केलं आहे. जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यातील बोरी नदीच्यापात्रातून सलग 20 दिवसांपासून अवैध वाळू उपसा होत असल्याची बातमी आयबीएन लोकमतनं दिली होती. तिथं गावकर्‍यांनीही अवैध वाळू उपसा हाणून पाडत उपसा करणार्‍या जेसीबीच्या ड्रायव्हरला पकडलं होतं. या अवैध उपशाकडे दुर्लक्ष करणार्‍या सरकारी अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी करणखेडाच्या गावकर्‍यांनी केली होती. त्यावरच आता जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करत त्यांना निलंबित केलं आहे. कोणताही ठेका दिला नसताना सलग 20 दिवसांपासून बोरी नदीपात्रातून उपसा करणार्‍या ठेकेदाराला ग्रामस्थांनी गाशा गुंडाळायला लावला होता. अमळनेर तालुक्यातील करणखेडा गावाजवळील बोरी नदीच्या पात्रात हा वाळू-उपसा होत होता. गावकर्‍यांनी माहिती काढली तेव्हा कुठलाही ठेका दिला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. पण तरीही ठेकेदार महेंद्र लालवाणी याचं हा बेकायदेशीप वाळू उपसा सुरूच होता. त्यामुळे संतापलेल्या गावकर्‍यांनी वाळू उपसा हाणून पाडला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 1, 2011 10:06 AM IST

जळगावमध्ये अवैध वाळू उपसा प्रकरणी 2 जण निलंबित

01 फेब्रुवारी

जळगावमधील अवैध वाळू उपसा प्रकरणी आता जिल्हाधिकार्‍यांनी सर्कल ऑफिसर एम.एस.पठाण आणि तलाठी एस. पी. पाटील यांना निलंबित केलं आहे. जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यातील बोरी नदीच्यापात्रातून सलग 20 दिवसांपासून अवैध वाळू उपसा होत असल्याची बातमी आयबीएन लोकमतनं दिली होती. तिथं गावकर्‍यांनीही अवैध वाळू उपसा हाणून पाडत उपसा करणार्‍या जेसीबीच्या ड्रायव्हरला पकडलं होतं. या अवैध उपशाकडे दुर्लक्ष करणार्‍या सरकारी अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी करणखेडाच्या गावकर्‍यांनी केली होती. त्यावरच आता जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करत त्यांना निलंबित केलं आहे.

कोणताही ठेका दिला नसताना सलग 20 दिवसांपासून बोरी नदीपात्रातून उपसा करणार्‍या ठेकेदाराला ग्रामस्थांनी गाशा गुंडाळायला लावला होता. अमळनेर तालुक्यातील करणखेडा गावाजवळील बोरी नदीच्या पात्रात हा वाळू-उपसा होत होता. गावकर्‍यांनी माहिती काढली तेव्हा कुठलाही ठेका दिला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. पण तरीही ठेकेदार महेंद्र लालवाणी याचं हा बेकायदेशीप वाळू उपसा सुरूच होता. त्यामुळे संतापलेल्या गावकर्‍यांनी वाळू उपसा हाणून पाडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 1, 2011 10:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close