S M L

इजिप्तमध्ये 'मार्च ऑफ द मिलियन्स'मध्ये 10 लाख लोक उतरले रस्त्यावर

01 फेब्रुवारीइजिप्तमध्ये आज लाखो लोक रस्त्यावर उतरले. इजिप्तमध्ये 'मार्च ऑफ द मिलियन्स' चं आयोजन करण्यात आलं. राजीनाम्यासाठी आता अध्यक्ष होस्ने मुबारक यांच्यावरचा दबाव वाढत चालला आहे. आंदोलक कैरोच्या तहरीर चौकामध्ये एकत्र आले आहेत. हे आंदोलक इथपर्यंत पोचू नयेत म्हणून रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहेत. मोबाईल नेटवर्क्स आणि इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली. कैरोतल्या बँका आणि शाळा बंद आहेत. स्टॉक एक्स्चेंजचं कामही ठप्प झालं. आतापर्यंत या आंदोलनात 150 जणांचा बळी गेला आहे. पण आता आपण यापुढे आंदोलकांवर गोळीबार करणार नसल्याचे इजिप्तच्या लष्कराने म्हटलंय. दरम्यान इजिप्तमधल्या सर्व भारतीयांनी मायदेशी परत यावं असं आवाहन परराष्ट्रमंत्री यांनी केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 1, 2011 11:54 AM IST

इजिप्तमध्ये 'मार्च ऑफ द मिलियन्स'मध्ये 10 लाख लोक उतरले रस्त्यावर

01 फेब्रुवारी

इजिप्तमध्ये आज लाखो लोक रस्त्यावर उतरले. इजिप्तमध्ये 'मार्च ऑफ द मिलियन्स' चं आयोजन करण्यात आलं. राजीनाम्यासाठी आता अध्यक्ष होस्ने मुबारक यांच्यावरचा दबाव वाढत चालला आहे. आंदोलक कैरोच्या तहरीर चौकामध्ये एकत्र आले आहेत. हे आंदोलक इथपर्यंत पोचू नयेत म्हणून रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहेत. मोबाईल नेटवर्क्स आणि इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली. कैरोतल्या बँका आणि शाळा बंद आहेत. स्टॉक एक्स्चेंजचं कामही ठप्प झालं. आतापर्यंत या आंदोलनात 150 जणांचा बळी गेला आहे. पण आता आपण यापुढे आंदोलकांवर गोळीबार करणार नसल्याचे इजिप्तच्या लष्कराने म्हटलंय. दरम्यान इजिप्तमधल्या सर्व भारतीयांनी मायदेशी परत यावं असं आवाहन परराष्ट्रमंत्री यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 1, 2011 11:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close