S M L

आदर्श प्रकरणी अशोक चव्हाणही आरोपी !

02 फेब्रुवारीआदर्श सोसायटी घोटाळ्या प्रकरणी सीबीआयनं 29 जानेवारीला एफआयआर दाखल केलं होतं. या एफआयआरमध्ये 13 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र या एफआयआर मध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आरोपी आहेत की नाही हे स्पष्ट करण्यात आलं नव्हतं. दरम्यान आज मंगळवारी कोर्टात एफआयआर सादर केला आहे. यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचंही आरोपी म्हणून नाव आहे. त्याचबरोबर प्रदीप व्यास, कन्हैयालाल गिडवाणी, आर सी ठाकूर, एम .एम. वांच्छू यांनाही आरोपी करण्यात आलं. मेजर जनरल ए आर कुमार, आर सी शर्मा. टी के कौल. रामानंद तिवारी आणि सुभाष लाला यांचेही नाव या अहवालात आहे. कमांडंट पी के आणि पी व्ही देशमुख यांचेही नाव आहे.सीबीआयने एफआयआर दाखल करताचं छापे मारण्यास जोरदार कारवाई सुरू केली. सीबीआयच्या 4 जणांच्या टीमनं ही कारवाई केली. यात प्रमोटर कन्हैयालाल गिडवाणी, आर. सी. ठाकूर तसेच आदर्शचे अध्यक्ष एम. एम. वांच्छू यांच्या घरावर सीबीआयनं छापे टाकले आहेत. कन्हैयालाल गिडवाणी यांच्या पुण्यातल्या दोन घरांवर आणि ऑफिसवरही छापे टाकण्यात आलेत. तर आर. सी ठाकूर यांच्या ठाणे, नागपूर आणि बिहारमधल्या पाटणा इथल्या घरांवर छापे टाकण्यात आले. ठाकूर यांच्या ठाण्यातल्या रोनक पार्क इथल्या घरावर काल सकाळी 7 वाजता सीबीआयनं छापा टाकला. तर वांच्छू यांच्या पुण्यातल्या साळूंखे विहारमध्येही सीबीआयनं छापा टाकला. तर संध्याकाळी राज्याचे निलंबित माहिती आयुक्त रामानंद तिवारी यांच्या घरावर सीबीआयनं छापा टाकला. त्याबरोबरच निवृत्त उपसचिव पी.व्ही.देशमुख यांच्या ठाण्यातील घरावही छापा टाकण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 1, 2011 12:26 PM IST

आदर्श प्रकरणी अशोक चव्हाणही आरोपी !

02 फेब्रुवारी

आदर्श सोसायटी घोटाळ्या प्रकरणी सीबीआयनं 29 जानेवारीला एफआयआर दाखल केलं होतं. या एफआयआरमध्ये 13 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र या एफआयआर मध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आरोपी आहेत की नाही हे स्पष्ट करण्यात आलं नव्हतं. दरम्यान आज मंगळवारी कोर्टात एफआयआर सादर केला आहे. यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचंही आरोपी म्हणून नाव आहे. त्याचबरोबर प्रदीप व्यास, कन्हैयालाल गिडवाणी, आर सी ठाकूर, एम .एम. वांच्छू यांनाही आरोपी करण्यात आलं. मेजर जनरल ए आर कुमार, आर सी शर्मा. टी के कौल. रामानंद तिवारी आणि सुभाष लाला यांचेही नाव या अहवालात आहे. कमांडंट पी के आणि पी व्ही देशमुख यांचेही नाव आहे.

सीबीआयने एफआयआर दाखल करताचं छापे मारण्यास जोरदार कारवाई सुरू केली. सीबीआयच्या 4 जणांच्या टीमनं ही कारवाई केली. यात प्रमोटर कन्हैयालाल गिडवाणी, आर. सी. ठाकूर तसेच आदर्शचे अध्यक्ष एम. एम. वांच्छू यांच्या घरावर सीबीआयनं छापे टाकले आहेत. कन्हैयालाल गिडवाणी यांच्या पुण्यातल्या दोन घरांवर आणि ऑफिसवरही छापे टाकण्यात आलेत. तर आर. सी ठाकूर यांच्या ठाणे, नागपूर आणि बिहारमधल्या पाटणा इथल्या घरांवर छापे टाकण्यात आले. ठाकूर यांच्या ठाण्यातल्या रोनक पार्क इथल्या घरावर काल सकाळी 7 वाजता सीबीआयनं छापा टाकला. तर वांच्छू यांच्या पुण्यातल्या साळूंखे विहारमध्येही सीबीआयनं छापा टाकला. तर संध्याकाळी राज्याचे निलंबित माहिती आयुक्त रामानंद तिवारी यांच्या घरावर सीबीआयनं छापा टाकला. त्याबरोबरच निवृत्त उपसचिव पी.व्ही.देशमुख यांच्या ठाण्यातील घरावही छापा टाकण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 1, 2011 12:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close