S M L

ए.राजा यांना अखेर अटक

02 फेब्रुवारी2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांना अखेर अटक झाली आहे. सीबीआयनं ही कारवाई केली. त्यांच्याबरोबर माजी टेलिकॉम सचिव सिद्धार्थ बेहुरा आणि राजाचे माजी खाजगी सचिव आर. के. चंडोलिया यांनाही अटक करण्यात आली. राजा यांना आयपीसी 120B, 13(2), 13(1D), कलमांतर्गत अटक करण्यात आली. राजा यांना अटक करायला सीबीआयनं उशीर केला. यासंदर्भात डीएमके प्रमुख करुणानिधी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात बैठक झाली होती. यानंतर राजा यांना आज अटक करण्यात आली. कायदा त्यांचं काम करतोय या अटकेमुळे काँग्रेस आणि द्रमुकच्या संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस आणि डीएमके या दोन्ही पक्षांनी दिली. यामध्ये सरकारच्या धोरणाचे उल्लंघन करणे, गैरकारभार करणे आणि काही कंपन्यांना फायदा मिळवून देण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला.घोटाळ्यांचा राजा आता अखेरीस गजाआड गेला. देशातला आजवरचा सगळ्यांत मोठा घोटाळा करून सरकारी तिजोरीला एक लाख 76 हजार कोटी रुपयांचे नुकसान करणारे माजी दूरसंचार मंत्री ए राजा यांना सीबीआयने दुपारी 3 वाजता अटक केली. आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अडीच महिन्यांनी आणि करुणानिधी सोनिया गांधींना भेटल्यावर दोन दिवसांनी सीबीआयने ही कारवाई केली. राजांसोबत तुरुंगात त्यांचे जुने साथीदारही असतील. माजी दूरसंचार सचिव सिद्धार्थ बेहुरिया आणि राजांचे माजी स्वीय सचिव आर के चंडोलिया यांना अटक करण्यात आली. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर आल्यामुळे आणि 2 जीच्या मुद्द्यावरून भाजप अजूनही आक्रमक असल्यामुळे राजांची अटक टाळणं कठीण होतं. पण ही कारवाई होऊनही भाजप समाधानी नाही. आपल्या जेपीसीच्या मागणीवर तर ते ठाम आहेत. शिवाय राजांनंतर त्यांनी आता पुन्हा एकदा पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. सीबीआयची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चालू आहे. येत्या दहा फेब्रुवारीला या केसची पुढची सुनावणी आहे. त्याआधी सीबीआयने ही कारवाई केली. त्यामुळे या कारवाईचं श्रेय सुप्रीम कोर्टाला द्यायला हवं असं याचिकाकर्ते सुब्रमण्यम स्वामींचं म्हणणं आहे. ए.राजा : ठपका ते अटक- 13 सप्टेंबर, 2010 : सुप्रीम कोर्टानं ए.राजा यांना नोटीस बजावली- ऑक्टोबर, 2010 : ए.राजा यांनी राजीनामा द्यायला नकार दिला- नोव्हेंबर, 2010 : राजांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधकांचा केंद्र सरकारवर दबाव- नोव्हेंबर, 2010 : 2जी घोटाळ्याची जेपीसीमार्फत चौकशी करण्याची विरोधकांची मागणी- नोव्हेंबर, 2010 : जेपीसी च्या मागणीवरुन हिवाळी अधिवेशनात कामकाज ठप्प- 14 नोव्हेंबर, 2010 : अखेर ए.राजा यांनी दिला केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा- 16 नोव्हेंबर, 2010 : 2 जी स्पेक्ट्रम संबंधित कॅग अहवाल केंद्र सरकारने सभागृहासमोर मांडला - 7 डिसेंबर, 2010 : ए.राजा आणि सहकार्‍यांच्या मालमत्तेवर सीबीआयची धाड- 2 फेब्रुवारी, 2011 : ए.राजा यांना सीबीआयनं केली अटकराजा यांच्यावर ठपका - 1 एक लाख 76 हजार कोटींचा घोटाळा दूरसंचार मंत्री ए. राजा यांनी 'ट्राय' वर ढकलली जबाबदारी - 2 जी स्पेक्ट्रम वाटपाबद्दल ए. राजा यांनी सगळ्यांच्या सल्ल्याकडे केलं दुर्लक्ष- स्पेक्ट्रमवाटपाच्या पद्धतीचं कोणतंही सबळ कारण दिलं नाही- दूरसंचार क्षेत्रातल्या काही ऑपरेटर्सनाच स्पेक्ट्रमचं वाटप - राजा यांच्या निर्णयामुळे सरकारचं 90 हजार कोटी ते एक लाख 40 हजार कोटींचं नुकसान - राजा यांच्या निर्णयाबद्दल 'ट्राय' ची तटस्थ भूमिका - स्पेक्ट्रम वाटपासाठीच्या पात्रतेचे निकष दूरसंचार खात्याने परस्पर ठरवले - दूरसंचार खात्याच्या मौल्यवान संपत्तीची कमी किंमतीत विक्री - 9 ऑपरेटर्सना जादा स्पेक्ट्रम वाटप, 36 हजार 729 कोटींचं जादा नुकसान

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 2, 2011 09:45 AM IST

ए.राजा यांना अखेर अटक

02 फेब्रुवारी

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांना अखेर अटक झाली आहे. सीबीआयनं ही कारवाई केली. त्यांच्याबरोबर माजी टेलिकॉम सचिव सिद्धार्थ बेहुरा आणि राजाचे माजी खाजगी सचिव आर. के. चंडोलिया यांनाही अटक करण्यात आली. राजा यांना आयपीसी 120B, 13(2), 13(1D), कलमांतर्गत अटक करण्यात आली. राजा यांना अटक करायला सीबीआयनं उशीर केला. यासंदर्भात डीएमके प्रमुख करुणानिधी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात बैठक झाली होती. यानंतर राजा यांना आज अटक करण्यात आली. कायदा त्यांचं काम करतोय या अटकेमुळे काँग्रेस आणि द्रमुकच्या संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस आणि डीएमके या दोन्ही पक्षांनी दिली. यामध्ये सरकारच्या धोरणाचे उल्लंघन करणे, गैरकारभार करणे आणि काही कंपन्यांना फायदा मिळवून देण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला.

घोटाळ्यांचा राजा आता अखेरीस गजाआड गेला. देशातला आजवरचा सगळ्यांत मोठा घोटाळा करून सरकारी तिजोरीला एक लाख 76 हजार कोटी रुपयांचे नुकसान करणारे माजी दूरसंचार मंत्री ए राजा यांना सीबीआयने दुपारी 3 वाजता अटक केली. आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अडीच महिन्यांनी आणि करुणानिधी सोनिया गांधींना भेटल्यावर दोन दिवसांनी सीबीआयने ही कारवाई केली. राजांसोबत तुरुंगात त्यांचे जुने साथीदारही असतील. माजी दूरसंचार सचिव सिद्धार्थ बेहुरिया आणि राजांचे माजी स्वीय सचिव आर के चंडोलिया यांना अटक करण्यात आली. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर आल्यामुळे आणि 2 जीच्या मुद्द्यावरून भाजप अजूनही आक्रमक असल्यामुळे राजांची अटक टाळणं कठीण होतं. पण ही कारवाई होऊनही भाजप समाधानी नाही. आपल्या जेपीसीच्या मागणीवर तर ते ठाम आहेत. शिवाय राजांनंतर त्यांनी आता पुन्हा एकदा पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. सीबीआयची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चालू आहे. येत्या दहा फेब्रुवारीला या केसची पुढची सुनावणी आहे. त्याआधी सीबीआयने ही कारवाई केली. त्यामुळे या कारवाईचं श्रेय सुप्रीम कोर्टाला द्यायला हवं असं याचिकाकर्ते सुब्रमण्यम स्वामींचं म्हणणं आहे.

ए.राजा : ठपका ते अटक

- 13 सप्टेंबर, 2010 : सुप्रीम कोर्टानं ए.राजा यांना नोटीस बजावली- ऑक्टोबर, 2010 : ए.राजा यांनी राजीनामा द्यायला नकार दिला- नोव्हेंबर, 2010 : राजांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधकांचा केंद्र सरकारवर दबाव- नोव्हेंबर, 2010 : 2जी घोटाळ्याची जेपीसीमार्फत चौकशी करण्याची विरोधकांची मागणी- नोव्हेंबर, 2010 : जेपीसी च्या मागणीवरुन हिवाळी अधिवेशनात कामकाज ठप्प- 14 नोव्हेंबर, 2010 : अखेर ए.राजा यांनी दिला केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा- 16 नोव्हेंबर, 2010 : 2 जी स्पेक्ट्रम संबंधित कॅग अहवाल केंद्र सरकारने सभागृहासमोर मांडला - 7 डिसेंबर, 2010 : ए.राजा आणि सहकार्‍यांच्या मालमत्तेवर सीबीआयची धाड- 2 फेब्रुवारी, 2011 : ए.राजा यांना सीबीआयनं केली अटक

राजा यांच्यावर ठपका

- 1 एक लाख 76 हजार कोटींचा घोटाळा दूरसंचार मंत्री ए. राजा यांनी 'ट्राय' वर ढकलली जबाबदारी - 2 जी स्पेक्ट्रम वाटपाबद्दल ए. राजा यांनी सगळ्यांच्या सल्ल्याकडे केलं दुर्लक्ष- स्पेक्ट्रमवाटपाच्या पद्धतीचं कोणतंही सबळ कारण दिलं नाही- दूरसंचार क्षेत्रातल्या काही ऑपरेटर्सनाच स्पेक्ट्रमचं वाटप - राजा यांच्या निर्णयामुळे सरकारचं 90 हजार कोटी ते एक लाख 40 हजार कोटींचं नुकसान - राजा यांच्या निर्णयाबद्दल 'ट्राय' ची तटस्थ भूमिका - स्पेक्ट्रम वाटपासाठीच्या पात्रतेचे निकष दूरसंचार खात्याने परस्पर ठरवले - दूरसंचार खात्याच्या मौल्यवान संपत्तीची कमी किंमतीत विक्री - 9 ऑपरेटर्सना जादा स्पेक्ट्रम वाटप, 36 हजार 729 कोटींचं जादा नुकसान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 2, 2011 09:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close