S M L

मनसेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा वाढता विरोध

4 नोव्हेंबर, मुंबईविनोद तळेकरमनसेला विरोध करण्यासाठी आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्हा पक्ष पुढे आले आहेत. मनसेचे कार्यकर्ते उत्तरभारतीयांना मारहाण करत असताना दोन्ही पक्ष गप्प होते. पण त्यावर टीका झाल्यामुळं आता हे दोन्ही पक्ष आता राज ठाकरेंविरोधात बोलू लागले आहेत. रेल्वे भरतीच्या परीक्षेसाठी आलेल्या उत्तरभारतीय विद्यार्थ्यांना मारहाण करून मनसेने पुन्हा उत्तरभारतीयांच्या विरोधात वातावरण तापवलं. या काळात मुंबई आणि राज्याच्या अनेक भागात मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर धिंगाणा घातला आणि त्यांच्याविरोधात पोलिसांनी जी पावलं उचलली ती राज्य सरकारची मनसेबाबत भूमिका काय आहे, हे स्पष्ट करण्यासाठी पुरेशी होती. त्यानंतर देशभरातून, विशेषतः उत्तर भारतीय नेत्यांनी राज्य सरकारवर कडक शब्दांत टीका केली. त्यामुळेच की काय मुंबई काँग्रेसनं सोमवारी एक पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध केला. पण या पत्रकार परिषदेला मुंबई काँग्रेसचे मोठे नेते गैरहजर होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं याही पुढे जात निषेधाबरोबर खुलं आव्हानच दिलं. ' जर मनसेने या गोष्टी बंद केल्या नाहीत तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याच भाषेत रस्त्यावर उतरून उत्तर देईल ' या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. एकीकडे शिवसेनेची वोटबँक तोडण्यासाठी सत्ताधार्‍यांनीच मनसेला मोकळीक दिली. पण देशभर त्याचे पडसाद उमटले. उत्तर भारतात सहा राज्यात निवडणुका असल्यामुळं उत्तरभारतीयांना मुंबईत झालेली मारहाण निवडणुकीत भारी पडू शकते, या भीतीनं हे दोन्ही पक्ष मनसे विरोधात बोलत आहेत आणि आपल्याच पक्षाची सत्ता असतानाही मनसेवर कारवाईची मागणी करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 4, 2008 10:56 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2008 10:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close