S M L

प्रकल्प येणारच असेल तर विकास पदरी पाडून घ्या -राणे

04 फेब्रुवारीजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांना भेटण्यासाठी उद्योगमंत्री नारायण राणेंचा दौरा सुरु झाला. आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांनी मीठ गव्हाणे इथं सभा घेतली. प्रकल्प येणारच असेल तर विकास पदरी पाडून घ्या असा सल्ला त्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिला. या प्रकल्पाग्रस्तांचं नेतृत्व करणार्‍या माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटिल आणि सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटिल यांच्यावर त्यांनी टीका केली. कोळसे पाटील यांनी स्थानिकांना भडकवण्याचं काम करु नये अशी शब्दात त्यांनी ही टीका केली. मीठ गव्हाणेच्या सभेनंतर ते साखरी नाटे इथं दुसरी सभा घेण्यासाठी रवाना झाले आहेत. मात्र राणेंच्या या दौर्‍यात खर्‍या प्रकल्पग्रस्तांपेक्षा राजकीय कार्यकर्त्यांचाच भरणा अधिक आहे. दरम्यान पोलिसांनी या परीसरात लागू केलेला जमावबंदी आदेश राणे यांच्या सभेसाठी शिथील केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2011 11:49 AM IST

प्रकल्प येणारच असेल तर विकास पदरी पाडून घ्या -राणे

04 फेब्रुवारी

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांना भेटण्यासाठी उद्योगमंत्री नारायण राणेंचा दौरा सुरु झाला. आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांनी मीठ गव्हाणे इथं सभा घेतली. प्रकल्प येणारच असेल तर विकास पदरी पाडून घ्या असा सल्ला त्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिला. या प्रकल्पाग्रस्तांचं नेतृत्व करणार्‍या माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटिल आणि सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटिल यांच्यावर त्यांनी टीका केली. कोळसे पाटील यांनी स्थानिकांना भडकवण्याचं काम करु नये अशी शब्दात त्यांनी ही टीका केली. मीठ गव्हाणेच्या सभेनंतर ते साखरी नाटे इथं दुसरी सभा घेण्यासाठी रवाना झाले आहेत. मात्र राणेंच्या या दौर्‍यात खर्‍या प्रकल्पग्रस्तांपेक्षा राजकीय कार्यकर्त्यांचाच भरणा अधिक आहे. दरम्यान पोलिसांनी या परीसरात लागू केलेला जमावबंदी आदेश राणे यांच्या सभेसाठी शिथील केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2011 11:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close