S M L

स्वरभास्कराच्या स्मृती जपण्याकरता म्युझिक गॅलरी सुरू होणार

अद्वैत मेहता, पुणे05 फेब्रुवारीभारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृती जपण्याकरता पुणे महानगरपालिका येत्या 10 फेब्रुवारीपासून पंडितजींच्या नावाचं कलादालन आणि म्युझिक गॅलरी सुरू करत आहे. या संकुलाचं उदघाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी, किशोरी आमोणकर, सरस्वतीबाई राणे अशा असंख्य दिग्गजांच्या जुन्या मैफिली ऐकण्या पाहण्याचा आनंद लवकरच पुणेकरांना लुटता येणार आहे. पुणे महानगरपालिका साडेतीन कोटी रूपये खर्चून पुण्याच्या सहकारनगर भागातील वसंतराव बागूल उद्यानात पंडित भीमसेन जोशी कलादालन आणि म्युजिक गॅलरी साकारलं जाणार आहे. नाममात्र दरात इथं रसिकांना हा सगळा ठेवा अनुभवता येणार आहे.12 हजार स्क्वेअर फुटाच्या जागेत हा उपक्रम साकारला जातोय यामध्ये 80 लोक बसू शकतील असं ऑडीटोरियम, एकावेळी 28 रसिक कॉंप्युटर आणि हेडफोन लावून जुन्या मैफिली ऐकू शकतील अशी क्युबिकल्स तसंच चित्रप्रदर्शनाकरता आर्ट गॅलरी ही या दालनाची वैशिष्ट्य आहेत. ख्यातनाम चित्रपट समिक्षक सुलभा तेरणीकरांच्या नेत्‌ृत्वाखालील तज्ज्ञांनी याकरता मार्गदर्शन केलं आहे. याशिवाय जुन्या जमान्यातले ग्रामोफोन्स, पियानो, प्रसिध्द कलाकारांची पोर्ट्रेट्सही या ठिकाणी उपलब्ध केली गेली आहेत. एकूणच पुण्याच्या सांस्कृतिक वैभवार भर टाकणारं हे कलादालन कलाकार आणि रसिकांकरता पर्वणीच ठरणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 5, 2011 11:19 AM IST

स्वरभास्कराच्या स्मृती जपण्याकरता म्युझिक गॅलरी सुरू होणार

अद्वैत मेहता, पुणे

05 फेब्रुवारी

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृती जपण्याकरता पुणे महानगरपालिका येत्या 10 फेब्रुवारीपासून पंडितजींच्या नावाचं कलादालन आणि म्युझिक गॅलरी सुरू करत आहे. या संकुलाचं उदघाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.

पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी, किशोरी आमोणकर, सरस्वतीबाई राणे अशा असंख्य दिग्गजांच्या जुन्या मैफिली ऐकण्या पाहण्याचा आनंद लवकरच पुणेकरांना लुटता येणार आहे. पुणे महानगरपालिका साडेतीन कोटी रूपये खर्चून पुण्याच्या सहकारनगर भागातील वसंतराव बागूल उद्यानात पंडित भीमसेन जोशी कलादालन आणि म्युजिक गॅलरी साकारलं जाणार आहे. नाममात्र दरात इथं रसिकांना हा सगळा ठेवा अनुभवता येणार आहे.

12 हजार स्क्वेअर फुटाच्या जागेत हा उपक्रम साकारला जातोय यामध्ये 80 लोक बसू शकतील असं ऑडीटोरियम, एकावेळी 28 रसिक कॉंप्युटर आणि हेडफोन लावून जुन्या मैफिली ऐकू शकतील अशी क्युबिकल्स तसंच चित्रप्रदर्शनाकरता आर्ट गॅलरी ही या दालनाची वैशिष्ट्य आहेत. ख्यातनाम चित्रपट समिक्षक सुलभा तेरणीकरांच्या नेत्‌ृत्वाखालील तज्ज्ञांनी याकरता मार्गदर्शन केलं आहे. याशिवाय जुन्या जमान्यातले ग्रामोफोन्स, पियानो, प्रसिध्द कलाकारांची पोर्ट्रेट्सही या ठिकाणी उपलब्ध केली गेली आहेत. एकूणच पुण्याच्या सांस्कृतिक वैभवार भर टाकणारं हे कलादालन कलाकार आणि रसिकांकरता पर्वणीच ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2011 11:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close