S M L

जणगणनेच्या कामाला शिक्षकांच्या विरोध

05 फेब्रुवारीजनगणनेचं काम करायला शिक्षकांनी नकार दिला. याविरोधात शिक्षकांनी काम बंद आंदोलन केलं. आजपासून जनगणनेच्या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात झाली. कुळगाव बदलापूरच्या 476 शिक्षकांना आज जनगणनेच्या कामाचे साहित्य वाटप केले जाणार होते. मात्र शहरातल्या सर्व शिक्षकांनी हे साहित्य घ्यायलाच नकार दिला. जनगणनेच्या कामातून आम्हाला वगळण्यात यावे आणि मागच्या टप्प्यात केलेल्या कामाचे मानधन आधी द्यावं अशी मागणी शिक्षकांनी केली. हायकोर्टाच्या आदेशानुसार, 10 वी आणि 12 वीच्या शिक्षकांना जनगणनेच्या कामातून वगळावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तरीसुद्धा या शिक्षकांना जनगणनेचं काम देण्यात आलं असा शिक्षकांचा आरोप आहे. त्याविरोधात त्यांनी हे आंदोलन पुकारलं आहे. उद्यापासून 10 आणि 12 वीची प्रॅक्टिकल परीक्षा सुरु होणारे आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्याच्या जनगणनेच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती न झाल्याबद्दल शिक्षकांनी कामबंद आंदोलन केलं. त्यामुळे बदलापूर शहरामध्ये जनगननेच्या कामाचा मात्र बोजवारा उडाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 5, 2011 12:27 PM IST

जणगणनेच्या कामाला शिक्षकांच्या विरोध

05 फेब्रुवारी

जनगणनेचं काम करायला शिक्षकांनी नकार दिला. याविरोधात शिक्षकांनी काम बंद आंदोलन केलं. आजपासून जनगणनेच्या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात झाली. कुळगाव बदलापूरच्या 476 शिक्षकांना आज जनगणनेच्या कामाचे साहित्य वाटप केले जाणार होते. मात्र शहरातल्या सर्व शिक्षकांनी हे साहित्य घ्यायलाच नकार दिला. जनगणनेच्या कामातून आम्हाला वगळण्यात यावे आणि मागच्या टप्प्यात केलेल्या कामाचे मानधन आधी द्यावं अशी मागणी शिक्षकांनी केली. हायकोर्टाच्या आदेशानुसार, 10 वी आणि 12 वीच्या शिक्षकांना जनगणनेच्या कामातून वगळावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तरीसुद्धा या शिक्षकांना जनगणनेचं काम देण्यात आलं असा शिक्षकांचा आरोप आहे. त्याविरोधात त्यांनी हे आंदोलन पुकारलं आहे. उद्यापासून 10 आणि 12 वीची प्रॅक्टिकल परीक्षा सुरु होणारे आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्याच्या जनगणनेच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती न झाल्याबद्दल शिक्षकांनी कामबंद आंदोलन केलं. त्यामुळे बदलापूर शहरामध्ये जनगननेच्या कामाचा मात्र बोजवारा उडाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2011 12:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close