S M L

मंत्र्यांची हफ्तेखोरी रोखली असती तर सोनवणेंचा मृत्यू झाला नसता - गडकरी

05 फेब्रुवारीआम्ही विरोधी पक्षात असताना सरकारचे चार हजार कोटी रूपये वाचविले होते. त्यावेळी मला चारशे कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. ती रक्कम मला अद्यापही दिलेली नाही. ते जाऊ द्या, पण तेव्हापासून सुरु असलेली मंत्र्यांची हफ्तेखोरी रोखली असती तर यशवंत सोनवणे यांचा मृत्यू झाला नसता अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी यांनी या बैठकीत केली. ते भाजपच्या राज्य कार्यसमितीच्या बैठकीत बोलत होते. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, व्यंकया नायडू, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे यांच्यासह भाजपचे राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीसाठी औरंगाबादमध्ये उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या काल शुक्रवारपासून सुरू असलेल्या राज्य कार्यसमितीच्या बैठकीत नितिन गडकरी यांनी आज मार्गदर्शन केले. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, व्यंकया नायडू, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपच्या राज्यभरातील प्रमुख पदाधिकार्‍यांची या बैठकीला उपस्थिती होते. आपल्या उदघाटनपर भाषणात गडकरी यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या हफ्तेखोरीवर थेट हल्लाबोल केला. आम्ही विरोधी पक्षात असताना राज्य सरकारचे चार हजार कोटी वाचविले होते. ती रक्कम तेव्हाच मंत्र्यांंची हफ्तेखोरी रोखली असती तर यशंवंत सोनवणे यांचा मृत्यू झाला नसता. भारतीय जनता पक्षाच्या या बैठकीत प्रामुख्याने काँग्रेसच्या धोरणावर टीका करण्यात आली. महागाईपासून ते काश्मीर प्रश्नापर्यंत काँग्रेसची रणनिती चुकल्याचं गडकरी यांनी सांगितलं. वल्लभभाई पटेल यांच्या हातात काश्मीरचा प्रश्न असता तर त्यांनी तो सोडविला असता असंही गडकरी म्हणाले. महागाई वाढत आहे. आज देशातील नव्वद टक्के लोकांना केवळ वीस रूपये रोज मिळतो. ते कसे जगतील. याला काँग्रेसची अर्थनिती कारणीभूत आहे. साठपैकी पंच्चावन्न वर्ष सत्तेवर असूनही त्यांनी हे प्रश्न सोडविले नाहीत. अगदी 1947 मध्ये वल्लभभाई पटले यांनी सर्व राज्य खालसा करून घेतली. पण फक्त काश्मीरचा प्रश्न पंडित जवाहरलाल नेहरूंनी हाताळल्याने तो प्रश्न आजही तसाच आहे. म्हणून या सर्व आर्थिक आणि राष्ट्रीय प्रस्शांना सोडविण्याची रणनिती भाजपनं आखली. भाजपच्या या अधिवशेनाचा रविवारी समारोप झाला आहे. सुरेश जैन पूर्णत: शिवसैनिक नाहीत - खडसेदरम्यान सुरेशदादा जैन हे पूर्णत: शिवसैनिक नाहीत. त्यामुळे त्यांच्या बडबडीकडे लक्ष देण्याची गरज नाही अशी भूमिका विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी घेतली. मात्र सुरेश जैन यांनी केलेली टीका ही एकनाथ ख़डसे यांच्यावर केलेली वैयक्तिक टीका नाही किंवा स्थानिक वादही नाही. त्यामुळे त्याचे परिणाम लवकरच दिसतील अशी रोखठोक भूमिका भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 5, 2011 04:07 PM IST

मंत्र्यांची हफ्तेखोरी रोखली असती तर सोनवणेंचा मृत्यू झाला नसता - गडकरी

05 फेब्रुवारी

आम्ही विरोधी पक्षात असताना सरकारचे चार हजार कोटी रूपये वाचविले होते. त्यावेळी मला चारशे कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. ती रक्कम मला अद्यापही दिलेली नाही. ते जाऊ द्या, पण तेव्हापासून सुरु असलेली मंत्र्यांची हफ्तेखोरी रोखली असती तर यशवंत सोनवणे यांचा मृत्यू झाला नसता अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी यांनी या बैठकीत केली. ते भाजपच्या राज्य कार्यसमितीच्या बैठकीत बोलत होते. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, व्यंकया नायडू, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे यांच्यासह भाजपचे राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीसाठी औरंगाबादमध्ये उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाच्या काल शुक्रवारपासून सुरू असलेल्या राज्य कार्यसमितीच्या बैठकीत नितिन गडकरी यांनी आज मार्गदर्शन केले. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, व्यंकया नायडू, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपच्या राज्यभरातील प्रमुख पदाधिकार्‍यांची या बैठकीला उपस्थिती होते. आपल्या उदघाटनपर भाषणात गडकरी यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या हफ्तेखोरीवर थेट हल्लाबोल केला. आम्ही विरोधी पक्षात असताना राज्य सरकारचे चार हजार कोटी वाचविले होते. ती रक्कम तेव्हाच मंत्र्यांंची हफ्तेखोरी रोखली असती तर यशंवंत सोनवणे यांचा मृत्यू झाला नसता. भारतीय जनता पक्षाच्या या बैठकीत प्रामुख्याने काँग्रेसच्या धोरणावर टीका करण्यात आली. महागाईपासून ते काश्मीर प्रश्नापर्यंत काँग्रेसची रणनिती चुकल्याचं गडकरी यांनी सांगितलं. वल्लभभाई पटेल यांच्या हातात काश्मीरचा प्रश्न असता तर त्यांनी तो सोडविला असता असंही गडकरी म्हणाले. महागाई वाढत आहे. आज देशातील नव्वद टक्के लोकांना केवळ वीस रूपये रोज मिळतो. ते कसे जगतील. याला काँग्रेसची अर्थनिती कारणीभूत आहे. साठपैकी पंच्चावन्न वर्ष सत्तेवर असूनही त्यांनी हे प्रश्न सोडविले नाहीत. अगदी 1947 मध्ये वल्लभभाई पटले यांनी सर्व राज्य खालसा करून घेतली. पण फक्त काश्मीरचा प्रश्न पंडित जवाहरलाल नेहरूंनी हाताळल्याने तो प्रश्न आजही तसाच आहे. म्हणून या सर्व आर्थिक आणि राष्ट्रीय प्रस्शांना सोडविण्याची रणनिती भाजपनं आखली. भाजपच्या या अधिवशेनाचा रविवारी समारोप झाला आहे.

सुरेश जैन पूर्णत: शिवसैनिक नाहीत - खडसे

दरम्यान सुरेशदादा जैन हे पूर्णत: शिवसैनिक नाहीत. त्यामुळे त्यांच्या बडबडीकडे लक्ष देण्याची गरज नाही अशी भूमिका विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी घेतली. मात्र सुरेश जैन यांनी केलेली टीका ही एकनाथ ख़डसे यांच्यावर केलेली वैयक्तिक टीका नाही किंवा स्थानिक वादही नाही. त्यामुळे त्याचे परिणाम लवकरच दिसतील अशी रोखठोक भूमिका भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2011 04:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close