S M L

2 जी घोटाळ्याप्रकरणी राजांबरोबर करुणानिधी यांनाही सहआरोपी करा- स्वामी

05 फेब्रुवारी2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी दिल्लीतल्या कोर्टानं सीबीआयला नोटीस बजावली आहे. 2 जी घोटाळ्याच्या चौकशीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टानं सीबीआयला दिले आहेत. जनता पक्षाचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून कोर्टानं ही नोटीस बजावली.2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी अटक केलेले माजी दूरसंचार मंत्री ए राजा यांच्यावर खटला चालवावा. तसेच द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी आणि राजा यांच्या नातेवाईकांनाही सहआरोपी करावे अशी मागणी स्वामी यांनी याचिकेत केली. दरम्यान,कॅगनं याबाबतचा आपला अहवाल कोर्टात सादर केला. तर, घोटाळ्याच्या चौकशीसाठी जेपीसीची मागणी सरकार मान्य करेल, अशी आशा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 5, 2011 05:13 PM IST

2 जी घोटाळ्याप्रकरणी राजांबरोबर करुणानिधी यांनाही सहआरोपी करा- स्वामी

05 फेब्रुवारी

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी दिल्लीतल्या कोर्टानं सीबीआयला नोटीस बजावली आहे. 2 जी घोटाळ्याच्या चौकशीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टानं सीबीआयला दिले आहेत. जनता पक्षाचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून कोर्टानं ही नोटीस बजावली.2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी अटक केलेले माजी दूरसंचार मंत्री ए राजा यांच्यावर खटला चालवावा. तसेच द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी आणि राजा यांच्या नातेवाईकांनाही सहआरोपी करावे अशी मागणी स्वामी यांनी याचिकेत केली. दरम्यान,कॅगनं याबाबतचा आपला अहवाल कोर्टात सादर केला. तर, घोटाळ्याच्या चौकशीसाठी जेपीसीची मागणी सरकार मान्य करेल, अशी आशा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2011 05:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close