S M L

काळा घोडा फेस्टिव्हलची धूम सुरु

06 फेब्रुवारीमुंबईत काल शनिवारपासून काळा घोडा फेस्टिव्हलची धूम सुरु झाली. 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार्‍या या फेस्टिव्हलमध्ये आर्ट, म्युझिक, कल्चर, पेंटींग, स्टेज परफॉरमन्सेस अशा अनेक गोष्टींचा आनंद मुंबईकरांना या घेता येणारे आहे. मुंबईकरांसाठी मेजवानी ठरणार्‍या या फेस्टिव्हलचं यंदांच हे 12 वं वर्ष आहे. पारंपारिक कला आविष्कारांबरोबरीनचं स्ट्रीट शो हा एक नवीन प्रकारसुद्धा या वर्षी काळा घोडा फेस्टिव्हलमध्ये पाहता येणार आहे. दररोज संध्याकाळी 5 वाजता हा स्ट्रीट शो आपल्याला पहायला मिळणार आहे. शनिवारी मुंबईकरांना या स्ट्रीट शोमध्ये मेजवानी मिळाली ती तारापुलीन प्रिन्सेसची. आपली सगळी दु:ख, चिंता दुर करणार्‍या या बाहुल्यांची मिरवणूक काढण्याची पद्धत परदेशात प्रचलित आहे. आणि त्यांची जादू काल मुंबईकरांनीही अनुभवली. रॅम्पोर्ट रोडपासून ते लायन गेटपर्यत ही मिरवणूक निघाली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 6, 2011 11:51 AM IST

काळा घोडा फेस्टिव्हलची धूम सुरु

06 फेब्रुवारी

मुंबईत काल शनिवारपासून काळा घोडा फेस्टिव्हलची धूम सुरु झाली. 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार्‍या या फेस्टिव्हलमध्ये आर्ट, म्युझिक, कल्चर, पेंटींग, स्टेज परफॉरमन्सेस अशा अनेक गोष्टींचा आनंद मुंबईकरांना या घेता येणारे आहे. मुंबईकरांसाठी मेजवानी ठरणार्‍या या फेस्टिव्हलचं यंदांच हे 12 वं वर्ष आहे. पारंपारिक कला आविष्कारांबरोबरीनचं स्ट्रीट शो हा एक नवीन प्रकारसुद्धा या वर्षी काळा घोडा फेस्टिव्हलमध्ये पाहता येणार आहे. दररोज संध्याकाळी 5 वाजता हा स्ट्रीट शो आपल्याला पहायला मिळणार आहे. शनिवारी मुंबईकरांना या स्ट्रीट शोमध्ये मेजवानी मिळाली ती तारापुलीन प्रिन्सेसची. आपली सगळी दु:ख, चिंता दुर करणार्‍या या बाहुल्यांची मिरवणूक काढण्याची पद्धत परदेशात प्रचलित आहे. आणि त्यांची जादू काल मुंबईकरांनीही अनुभवली. रॅम्पोर्ट रोडपासून ते लायन गेटपर्यत ही मिरवणूक निघाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 6, 2011 11:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close