S M L

मुंबई - गोवा हायवेवर झाडांची कत्तल सुरू

06 फेब्रुवारीमुंबई - गोवा हायवेवर सध्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू झाली. रस्ता रुंदीकरणासाठी हाय-वे ऑथॉरिटीने सुमारे 150 किलोमीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूंची झाडं तोडण्याचं काम ठेकेदारीवर दिलं. मात्र ठेकेदाराने बेकायदेशीरपणे ही वृक्षतोड केली असा आरोप इथल्या सामाजिक संघटनांनी केला. कित्येक वर्षं जुने असलेले वड, पिंपळ आणि आंब्याचे वृक्ष धडाधड तोडले जात आहेत. यामुळे पर्यावरणाची होणारी संभाव्य हानी टाळण्यासाठी हाय वे विभागाने जेवढी झाडं तोडली जातील तेवढी पुन्हा नवीन झाडं लावण्याचीही जबाबदारी पार पाडावी अशी मागणी लांजा तालुक्यातल्या सामाजिक संघटनांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 6, 2011 01:57 PM IST

मुंबई - गोवा हायवेवर झाडांची कत्तल सुरू

06 फेब्रुवारी

मुंबई - गोवा हायवेवर सध्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू झाली. रस्ता रुंदीकरणासाठी हाय-वे ऑथॉरिटीने सुमारे 150 किलोमीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूंची झाडं तोडण्याचं काम ठेकेदारीवर दिलं. मात्र ठेकेदाराने बेकायदेशीरपणे ही वृक्षतोड केली असा आरोप इथल्या सामाजिक संघटनांनी केला. कित्येक वर्षं जुने असलेले वड, पिंपळ आणि आंब्याचे वृक्ष धडाधड तोडले जात आहेत. यामुळे पर्यावरणाची होणारी संभाव्य हानी टाळण्यासाठी हाय वे विभागाने जेवढी झाडं तोडली जातील तेवढी पुन्हा नवीन झाडं लावण्याचीही जबाबदारी पार पाडावी अशी मागणी लांजा तालुक्यातल्या सामाजिक संघटनांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 6, 2011 01:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close