S M L

नाशिकच्या भोसला स्कूलमध्ये दहशतवाद शिकवत नाही - माजी विद्यार्थी

4 नोव्हेंबर, नाशिक मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलचं नाव आल्याच्या पार्श्वभूमीवर माजी विद्यार्थ्यांनी नुकतीच एक बैठक घेतली.आमची शाळा देशद्रोही घडवणारी नाही, तर देशभक्त घडवणारी असल्याचं मत भोसला स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं आहे. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासाच्या पार्श्वभूमीवर भोसलाच्या माजी विद्यार्थ्यांनी नाशिकमध्ये एक बैठक घेतली. भोसला स्कूलमध्ये कोणत्याही प्रकारचा धर्मवाद किंवा दहशतवाद शिकवला जात नसल्याचं त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितलं. त्यासाठी गोवा, नागपूर, मुंबई असे राज्यभरातून भोसलाचे माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. भोसलाचे माजी कमांडंट पी. बी. कुलकर्णी हे देखील यावेळी उपस्थित होते. ' या संघटनेचा भोसला मिलिटिरी स्कूल अथवा सेंट्रल हिंदू एज्युकेशन सोसायटीशी काहीही संबंध नाही. आम्ही सामाजिक संस्थांना जागा देतो. अनेक स्पोर्टस मीट इथे होतात. पोलिसांची ट्रेनिंग्ज होतात. आम्हाला ज्या चांगल्या संस्था आहेत, त्यांची बॅकग्राउंड माहीत नसते ', असं माजी कमांडंटपी. बी. कुलकर्णी यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 4, 2008 02:59 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2008 02:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close