S M L

स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी करुणानिधी कुटुंबियांचेही संबंध

07 फेब्रुवारी2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरण आता द्रमुक पक्षाच्या फर्स्ट फॅमिलीपर्यंत पोचलं आहे. आयबीएन-नेटवर्कच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्र लागली आहेत. त्यात द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांच्या मालकीच्या कलाईन्गार टीव्हीला स्पेक्ट्रम वाटपातल्या कंपन्यांकडून पैसा पुरवला गेल्याचं स्पष्ट झालं. 2 जी दूरसंचार मंत्री ए .राजा आणखी दोन दिवस सीबीआयच्या कोठडीत राहणार आहेत. आणि त्यातच 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात द्रमुकमधल्या इतरांच्याही भूमिकेविषयी आरोपांच्या फैरी झडत आहे. हे प्रकरण लावून धरणारे जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांनात या घोटाळ्यात ओढलं आहे. करुणानिधी यांनी स्वामी यांच्याविरोधात कायदेशीर नोटीस बजावलीय. पण आयबीएन-नेटवर्कच्या हाती लागलेल्या कागदपत्रात डी बी रिऍल्टी ग्रुपकडून करुणानिधींच्या संबंधित कलाईग्नार टीव्हीला अनेकदा कर्ज देण्यात आल्याचं दिसतं आहे.डी बी ग्रुप हा शहीद बलवास यांच्या मालकीचा आहे. बलवास यांचे शेअर्स स्वान टेलिकॉममध्ये आहेत. 2 जी घोटाळ्यात नाव असणार्‍या कंपन्यांपैकी स्वान हीसुद्धा एक आहे. कलाईग्नार टीव्हीला कर्ज देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तीन कंपन्यांची बॅलन्स शीट्स आयबीएन-नेटवर्ककडे उपलब्ध आहेत. कलाईग्नारमध्ये करुणानिधींच्या पत्नी ए. के. दयालू यांचे 60 टक्के तर त्यांची मुलगी कानिमोझी यांचे 20 टक्के शेअर्स आहेत. राजकीय वादळाला कारणीभूत ठरलेलं कलाईग्नार टीव्हीसाठी कर्ज- कलाईग्नारच्या बॅलन्स शीटमध्ये 214 कोटी 84 लाख रुपये विनातारण कर्जापोटी दाखवण्यात आले - सिनेयुग मीडिया आणि इन्टरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडकडून ही रक्कम आली- नेमकी रक्कम आहे 214 कोटी 86 लाख 54 हजार रुपये- 2009-2010 या वर्षात ती कलाईग्नारला विनातारण कर्ज म्हणून देण्यात आली - सिनेयुग ही कंपनी आसिफ बलवा आणि मोरानी बंधुंच्या मालकीची आहे. सिनेयुगला हे कर्ज कुठून मिळालं?- सिनेयुगच्या बॅलन्सशीटनुसार 121 कोटी रुपये कुसेगाव फ्रुट आणि व्हेजिटेबल्स प्रायव्हेट लिमिटेकडून मिळालेत. - कुसेगाव ही कंपनी आसिफ बलवा आणि राजीव अगरवाल यांच्या मालकीची आहे. - कुसेगावच्या बॅलन्सशीटमध्ये 209 कोटींचं विनातारण कर्ज दाखवण्यात आलंय. कलाईग्नार टीव्हीच्या अधिकार्‍यांनी या प्रकरणावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, डी. बी. रिऍल्टीनं आपल्या निवेदनात म्हटलंय की, 'डी. बी. रिऍल्टीचे सिनेयुग किंवा कलाईग्नारशी कोणतेच संबंध नाहीत.' पण आयबीएन-नेटवर्कच्या हाती असलेल्या बॅलन्सशीटमध्ये हे सर्व आर्थिक व्यवहार झाल्याचं स्पष्ट दिसतं आहे.2 जी लायसन्स ज्या कंपनीला मिळाले त्या कंपनीचे पैसे राजा यांचा पक्ष द्रमुकच्या मालकीच्या चॅनेलकडे गेल्याचं या सर्व व्यवहारातून स्पष्ट होतं. लाच देणारे आणि लाच घेणारे यांच्यातल्या संबंधांची आता सीबीआय चौकशी करतं आहे.या सर्वामुळे 2 जी स्पेक्ट्रमचा घोटाळा ए राजा यांच्या पलीकडे जाण्याची शक्यता आहे.दरम्यान करुणानिधी आणि जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांच्यातला संघर्ष चिघळला आहे. करुणानिधी यांच्याविरोधात खटला चालवायला परवानगी द्यावी अशा मागणीसाठी स्वामी यांनी तामिळनाडूच्या राज्यपालांकडे याचिका दाखल केली. तामिळनाडू हाऊसिंग बोर्डाशी संबधित असलेल्या भूखंड वाटपात मुख्यमंत्री करुणानिधी यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 7, 2011 05:05 PM IST

स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी करुणानिधी कुटुंबियांचेही संबंध

07 फेब्रुवारी

2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरण आता द्रमुक पक्षाच्या फर्स्ट फॅमिलीपर्यंत पोचलं आहे. आयबीएन-नेटवर्कच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्र लागली आहेत. त्यात द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांच्या मालकीच्या कलाईन्गार टीव्हीला स्पेक्ट्रम वाटपातल्या कंपन्यांकडून पैसा पुरवला गेल्याचं स्पष्ट झालं.

2 जी दूरसंचार मंत्री ए .राजा आणखी दोन दिवस सीबीआयच्या कोठडीत राहणार आहेत. आणि त्यातच 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात द्रमुकमधल्या इतरांच्याही भूमिकेविषयी आरोपांच्या फैरी झडत आहे. हे प्रकरण लावून धरणारे जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांनात या घोटाळ्यात ओढलं आहे. करुणानिधी यांनी स्वामी यांच्याविरोधात कायदेशीर नोटीस बजावलीय. पण आयबीएन-नेटवर्कच्या हाती लागलेल्या कागदपत्रात डी बी रिऍल्टी ग्रुपकडून करुणानिधींच्या संबंधित कलाईग्नार टीव्हीला अनेकदा कर्ज देण्यात आल्याचं दिसतं आहे.डी बी ग्रुप हा शहीद बलवास यांच्या मालकीचा आहे. बलवास यांचे शेअर्स स्वान टेलिकॉममध्ये आहेत. 2 जी घोटाळ्यात नाव असणार्‍या कंपन्यांपैकी स्वान हीसुद्धा एक आहे. कलाईग्नार टीव्हीला कर्ज देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तीन कंपन्यांची बॅलन्स शीट्स आयबीएन-नेटवर्ककडे उपलब्ध आहेत. कलाईग्नारमध्ये करुणानिधींच्या पत्नी ए. के. दयालू यांचे 60 टक्के तर त्यांची मुलगी कानिमोझी यांचे 20 टक्के शेअर्स आहेत.

राजकीय वादळाला कारणीभूत ठरलेलं कलाईग्नार टीव्हीसाठी कर्ज

- कलाईग्नारच्या बॅलन्स शीटमध्ये 214 कोटी 84 लाख रुपये विनातारण कर्जापोटी दाखवण्यात आले - सिनेयुग मीडिया आणि इन्टरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडकडून ही रक्कम आली- नेमकी रक्कम आहे 214 कोटी 86 लाख 54 हजार रुपये- 2009-2010 या वर्षात ती कलाईग्नारला विनातारण कर्ज म्हणून देण्यात आली - सिनेयुग ही कंपनी आसिफ बलवा आणि मोरानी बंधुंच्या मालकीची आहे.

सिनेयुगला हे कर्ज कुठून मिळालं?

- सिनेयुगच्या बॅलन्सशीटनुसार 121 कोटी रुपये कुसेगाव फ्रुट आणि व्हेजिटेबल्स प्रायव्हेट लिमिटेकडून मिळालेत. - कुसेगाव ही कंपनी आसिफ बलवा आणि राजीव अगरवाल यांच्या मालकीची आहे. - कुसेगावच्या बॅलन्सशीटमध्ये 209 कोटींचं विनातारण कर्ज दाखवण्यात आलंय.

कलाईग्नार टीव्हीच्या अधिकार्‍यांनी या प्रकरणावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, डी. बी. रिऍल्टीनं आपल्या निवेदनात म्हटलंय की, 'डी. बी. रिऍल्टीचे सिनेयुग किंवा कलाईग्नारशी कोणतेच संबंध नाहीत.' पण आयबीएन-नेटवर्कच्या हाती असलेल्या बॅलन्सशीटमध्ये हे सर्व आर्थिक व्यवहार झाल्याचं स्पष्ट दिसतं आहे.2 जी लायसन्स ज्या कंपनीला मिळाले त्या कंपनीचे पैसे राजा यांचा पक्ष द्रमुकच्या मालकीच्या चॅनेलकडे गेल्याचं या सर्व व्यवहारातून स्पष्ट होतं. लाच देणारे आणि लाच घेणारे यांच्यातल्या संबंधांची आता सीबीआय चौकशी करतं आहे.या सर्वामुळे 2 जी स्पेक्ट्रमचा घोटाळा ए राजा यांच्या पलीकडे जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान करुणानिधी आणि जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांच्यातला संघर्ष चिघळला आहे. करुणानिधी यांच्याविरोधात खटला चालवायला परवानगी द्यावी अशा मागणीसाठी स्वामी यांनी तामिळनाडूच्या राज्यपालांकडे याचिका दाखल केली. तामिळनाडू हाऊसिंग बोर्डाशी संबधित असलेल्या भूखंड वाटपात मुख्यमंत्री करुणानिधी यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2011 05:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close