S M L

पुण्यातील युएलसी घोटाळा हा आदर्श पेक्षाही मोठा हायकोर्टाचं मत

08 फेब्रुवारीपुण्यातील युएलसी घोटाळा हा आदर्श घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याचं मत हायकोर्टानं व्यक्त केलं. 300 कोटी रुपयांच्या या घोटाळ्याची चौकशी सीबीआय मार्फत व्हावी असंही हायकोर्टानं एका याचिकेवरील सुनावणी वेळी सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. एच. मार्लापल्ले आणि न्यायमूर्ती यु.डी. सालवी यांच्या खंडपीठानं मत व्यक्त केलं. या प्रकरणामध्ये सरकारी अधिकार्‍यांनी पदाचा गैरवापर करुन युएलसी कायद्या अर्तगत देण्यात येणार्‍या जमिनीमध्ये घोटाळा केल्याचे हायकोर्टाने सांगितलं आहे. या घोटाळ्याचे लाखो स्वेअर मिटर जागा बोगस युलसीच्या आधारे खाजगी लोकांना देण्यात आली. या जागेवर गरजू आणि गरिब लोकांसाठी घरे उभारण्यात येऊ शकता आली असती असं हायकोर्टानं सांगितलं. हायकोर्टात भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी पुण्यातील युलएलसी घोटाळ्याप्रकरणी सीआयडी चैाकशी करण्याची मागणी करण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाच्या पुढच्या सुनावणीच्या वेळेस सीबीआयच्या अधिकार्‍यांना कोर्टात हजर करण्याचेआदेशही हायकोर्टाने दिले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 8, 2011 11:12 AM IST

पुण्यातील युएलसी घोटाळा हा आदर्श पेक्षाही मोठा हायकोर्टाचं मत

08 फेब्रुवारी

पुण्यातील युएलसी घोटाळा हा आदर्श घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याचं मत हायकोर्टानं व्यक्त केलं. 300 कोटी रुपयांच्या या घोटाळ्याची चौकशी सीबीआय मार्फत व्हावी असंही हायकोर्टानं एका याचिकेवरील सुनावणी वेळी सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. एच. मार्लापल्ले आणि न्यायमूर्ती यु.डी. सालवी यांच्या खंडपीठानं मत व्यक्त केलं. या प्रकरणामध्ये सरकारी अधिकार्‍यांनी पदाचा गैरवापर करुन युएलसी कायद्या अर्तगत देण्यात येणार्‍या जमिनीमध्ये घोटाळा केल्याचे हायकोर्टाने सांगितलं आहे. या घोटाळ्याचे लाखो स्वेअर मिटर जागा बोगस युलसीच्या आधारे खाजगी लोकांना देण्यात आली. या जागेवर गरजू आणि गरिब लोकांसाठी घरे उभारण्यात येऊ शकता आली असती असं हायकोर्टानं सांगितलं. हायकोर्टात भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी पुण्यातील युलएलसी घोटाळ्याप्रकरणी सीआयडी चैाकशी करण्याची मागणी करण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाच्या पुढच्या सुनावणीच्या वेळेस सीबीआयच्या अधिकार्‍यांना कोर्टात हजर करण्याचेआदेशही हायकोर्टाने दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2011 11:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close