S M L

जळगावमध्ये 124 मोबाईल लॅब व्हॅनच्या मदतीने पेट्रोल पंपाची तपासणी

09 फेब्रुवारीजळगाव जिल्ह्यातील 124 पेट्रोल पंपाची पुरवठा खात्यानं तपासणी सुरु केली आहेत. मोबाईल लॅब व्हॅनच्या मदतीने ही तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे भेसळ सापडणार्‍या पंपावर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी के.सी. निकम यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरु आहे. प्रत्येक पंपावरुन पेट्रोलचे 8 नमुने घेण्यात येत आहेत. तसेच मोबाईल लॅबमध्ये या नमुन्यांची तत्काळ तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत नमुने तपासणीसाठी औरंगाबाद, पुणे आणि मुंबई इथल्या सरकारी प्रयोगशाळेत पाठवण्यात येत होते. त्यामुळे इंधनातील भेसळीबाबतचा अहवाल पुरवठा खात्याला उशीरा मिळत होता. पण या मोबाईल लॅबमुळे पुरवठा खात्याला हा अहवाल तात्काळ मिळतोय. दोषी पेट्रोल पंपावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 9, 2011 11:47 AM IST

जळगावमध्ये 124 मोबाईल लॅब व्हॅनच्या मदतीने पेट्रोल पंपाची तपासणी

09 फेब्रुवारी

जळगाव जिल्ह्यातील 124 पेट्रोल पंपाची पुरवठा खात्यानं तपासणी सुरु केली आहेत. मोबाईल लॅब व्हॅनच्या मदतीने ही तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे भेसळ सापडणार्‍या पंपावर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी के.सी. निकम यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरु आहे. प्रत्येक पंपावरुन पेट्रोलचे 8 नमुने घेण्यात येत आहेत. तसेच मोबाईल लॅबमध्ये या नमुन्यांची तत्काळ तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत नमुने तपासणीसाठी औरंगाबाद, पुणे आणि मुंबई इथल्या सरकारी प्रयोगशाळेत पाठवण्यात येत होते. त्यामुळे इंधनातील भेसळीबाबतचा अहवाल पुरवठा खात्याला उशीरा मिळत होता. पण या मोबाईल लॅबमुळे पुरवठा खात्याला हा अहवाल तात्काळ मिळतोय. दोषी पेट्रोल पंपावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2011 11:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close