S M L

पुण्यात वाहन चोरांची टोळी गजाआड

09 फेब्रुवारीचारचाकी वाहनांची चोरी करणार्‍या एका टोळीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणांहुन त्यांनी आत्तापर्यंत दिडशेहुन अधिक वाहनं चोरली होती. यापैकी या आरोपींकडुन आत्तापर्यंत 6 गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. क्राईम ब्रँचचे अप्पर पोलिस आयुक्त अनंत शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. आत्तापर्यंत या टोळीमधल्या एकुण 6 जणांना या अटक करण्यात आली आहे. तर त्यांचे 4 साथीदार फरारी आहेत. हे सर्व जण डुप्लिकेट चावीने चारचाकी वाहनांची चोरी करायचे आणि त्यानंतर ही वाहनं उत्तरप्रदेश, राजस्थान ,नेपाळ मध्ये नेऊन विकत असतात.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 9, 2011 11:54 AM IST

पुण्यात वाहन चोरांची टोळी गजाआड

09 फेब्रुवारी

चारचाकी वाहनांची चोरी करणार्‍या एका टोळीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणांहुन त्यांनी आत्तापर्यंत दिडशेहुन अधिक वाहनं चोरली होती. यापैकी या आरोपींकडुन आत्तापर्यंत 6 गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. क्राईम ब्रँचचे अप्पर पोलिस आयुक्त अनंत शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. आत्तापर्यंत या टोळीमधल्या एकुण 6 जणांना या अटक करण्यात आली आहे. तर त्यांचे 4 साथीदार फरारी आहेत. हे सर्व जण डुप्लिकेट चावीने चारचाकी वाहनांची चोरी करायचे आणि त्यानंतर ही वाहनं उत्तरप्रदेश, राजस्थान ,नेपाळ मध्ये नेऊन विकत असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2011 11:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close