S M L

स्पेक्ट्रम प्रकरणी रिलायन्स अडचणीत

10 फेब्रुवारीटू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या चौकशीचा रोख आता रिलायन्सकडे वळला आहे. या घोटाळ्याचा फायदा उठवणार्‍या टेलिकॉम कंपन्यांवर काय कारवाई करण्यात आली याची विचारणा सुप्रीम कोर्टानं सीबीआयकडे केली आहे. तसेच डीबी रिऍल्टीजचे शाहीद बल्वा यांच्या अटकेनंतर आता डीबी ग्रुप आणि अंबानी ग्रुप यांचे हितसंबंधही उघड झाले आहे.टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी सुप्रीम कोर्टाला ए. राजा यांच्यापलीकडे न्यायची आहे. स्पेक्ट्रमच्या परवाने मिळवून त्याचा फायदा उठवणार्‍यांमध्ये बर्‍याच टेलिकॉम कंपन्या आहेत, असे ताशेरे कॅगने मारले. हे सगळे प्रकरण कोर्टात घेऊन जाणारे याचिकाकर्ते प्रशांत भूषण यांनी या प्रकरणात काही नावं घेतली आहे. त्यांनी रिलायन्सच्या कर्मचार्‍यांची चौकशी केलीय पण रिलायन्स आणि स्वान टेलिकॉमच्या टॉप मॅनेजमेंटला मात्र या चौकशीपासून दूर ठेवण्यात आलं आहे. या घोटाळ्याचा फायदा उठवणार्‍या टेलिकॉम कंपन्यांवर काय कारवाई करण्यात आली याची विचारणा कोर्टानं सीबीआयकडे केली आहे.संसदेत याआधीच मांडण्यात आलेल्या कॅगच्या अहवालानुसार अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपला या टू जी स्पेक्ट्रंम वाटपाचा फायदा झाला. डीबी रिऍल्टीजचे शाहीद बल्वा यांच्या अटकेनंतर आता डीबी ग्रुप आणि अंबानी ग्रुप यांचे हितसंबंध उघड झाले आहेत. रिलायन्सचं नाव यात आल्याने अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपच्या शेअर्समध्येही 10 टक्क्यांची घसरण झाली. कॅगच्या अहवालात एडीएजी चं नाव स्पष्टपणे घेण्यात आलं आहे. रिलायन्स टेलिकॉमने कायदे धाब्यावर बसवले असा ठपका ठेवण्यात आला आहे. - रिलायन्स टेलिकॉम लिमिटेडचे स्वान टेलिकॉममध्ये 10 टक्के शेअर्स आहेत. त्यामुळे त्यांचा अर्ज बेकादेशीर ठरतो.- मार्च 2007 13 सर्कलमध्ये स्वाननं परवान्यांसाठी अर्ज केला तेव्हा रिलायन्स टेलिकॉम लिमिटेडचा त्यात सहभाग होता.- याबद्दल कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयानं चौकशी करणं आवश्यक होतं- पण स्वान डिसेंबर 2007 मध्ये स्वानला सुधारित अर्ज करायला लागण्यात आलं. तोपर्यंत अर्जाची मुदतही संपली होती.स्वान टेलिकॉमनं इटिस्लॅट ग्रुपला त्यांचे 45 टक्के शेअर्स विकले आणि हजारो कोटींचा नफा कमवला. इटिस्लॅट नंतर इटिस्लॅट डीबी झालं. यामध्ये कॉमन फॅक्टर होते खुद्द अनिल अंबानी. सुप्रीम कोर्टाने एडिएजी ग्रुपचं नाव या घोटाळ्यात घेतल्याने आता अनिल अंबानींसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 10, 2011 05:38 PM IST

स्पेक्ट्रम प्रकरणी रिलायन्स अडचणीत

10 फेब्रुवारी

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या चौकशीचा रोख आता रिलायन्सकडे वळला आहे. या घोटाळ्याचा फायदा उठवणार्‍या टेलिकॉम कंपन्यांवर काय कारवाई करण्यात आली याची विचारणा सुप्रीम कोर्टानं सीबीआयकडे केली आहे. तसेच डीबी रिऍल्टीजचे शाहीद बल्वा यांच्या अटकेनंतर आता डीबी ग्रुप आणि अंबानी ग्रुप यांचे हितसंबंधही उघड झाले आहे.

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी सुप्रीम कोर्टाला ए. राजा यांच्यापलीकडे न्यायची आहे. स्पेक्ट्रमच्या परवाने मिळवून त्याचा फायदा उठवणार्‍यांमध्ये बर्‍याच टेलिकॉम कंपन्या आहेत, असे ताशेरे कॅगने मारले. हे सगळे प्रकरण कोर्टात घेऊन जाणारे याचिकाकर्ते प्रशांत भूषण यांनी या प्रकरणात काही नावं घेतली आहे.

त्यांनी रिलायन्सच्या कर्मचार्‍यांची चौकशी केलीय पण रिलायन्स आणि स्वान टेलिकॉमच्या टॉप मॅनेजमेंटला मात्र या चौकशीपासून दूर ठेवण्यात आलं आहे. या घोटाळ्याचा फायदा उठवणार्‍या टेलिकॉम कंपन्यांवर काय कारवाई करण्यात आली याची विचारणा कोर्टानं सीबीआयकडे केली आहे.

संसदेत याआधीच मांडण्यात आलेल्या कॅगच्या अहवालानुसार अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपला या टू जी स्पेक्ट्रंम वाटपाचा फायदा झाला. डीबी रिऍल्टीजचे शाहीद बल्वा यांच्या अटकेनंतर आता डीबी ग्रुप आणि अंबानी ग्रुप यांचे हितसंबंध उघड झाले आहेत. रिलायन्सचं नाव यात आल्याने अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपच्या शेअर्समध्येही 10 टक्क्यांची घसरण झाली.

कॅगच्या अहवालात एडीएजी चं नाव स्पष्टपणे घेण्यात आलं आहे. रिलायन्स टेलिकॉमने कायदे धाब्यावर बसवले असा ठपका ठेवण्यात आला आहे.

- रिलायन्स टेलिकॉम लिमिटेडचे स्वान टेलिकॉममध्ये 10 टक्के शेअर्स आहेत. त्यामुळे त्यांचा अर्ज बेकादेशीर ठरतो.- मार्च 2007 13 सर्कलमध्ये स्वाननं परवान्यांसाठी अर्ज केला तेव्हा रिलायन्स टेलिकॉम लिमिटेडचा त्यात सहभाग होता.- याबद्दल कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयानं चौकशी करणं आवश्यक होतं- पण स्वान डिसेंबर 2007 मध्ये स्वानला सुधारित अर्ज करायला लागण्यात आलं. तोपर्यंत अर्जाची मुदतही संपली होती.

स्वान टेलिकॉमनं इटिस्लॅट ग्रुपला त्यांचे 45 टक्के शेअर्स विकले आणि हजारो कोटींचा नफा कमवला. इटिस्लॅट नंतर इटिस्लॅट डीबी झालं. यामध्ये कॉमन फॅक्टर होते खुद्द अनिल अंबानी. सुप्रीम कोर्टाने एडिएजी ग्रुपचं नाव या घोटाळ्यात घेतल्याने आता अनिल अंबानींसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 10, 2011 05:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close