S M L

पुण्यात कलमाडींच्या पीएला अटक

11 फेब्रुवारीकॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडींना आणखी एक धक्का बसला आहे. सुरेश कलमाडी यांचे पीए आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे शेखर देवरुखकर यांना सीबीआयनं अटक केली आहे. पुण्याच्या कोथरुड भागातून सीबीआयनं देवरुखकर यांना अटक केली आहे. देवरुखकर यांची कसून चौकशी करण्यासाठी सीबीआयनं त्यांच्या ट्रांझिट रिमांडची मागणी केली होती. ही मागणी शिवाजीनगर कोर्टानं मान्य केली. शेखर देवरुखकर यांना सोमवारी अकराच्या आत पटियाला कोर्टात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या 15 वर्षापासून ते कलमाडींचे पी ए आहेत. कलमाडींचे अंत्यत विश्वासू म्हणूनही ते परिचित आहेत.शेखर देवरुखकर आणि कलमाडींशी त्यांचे काय हितसंबंध होते.कलमाडींची सावली म्हणून शेखर देवरूखकर ओळखला जातो. कलमाडींचा गेट पास म्हणून शेखर महत्वाचा मानला जातो. त्याला बायपास करून कलमाडींपर्यंत पोहचणं केवळ अशक्य. एरव्ही टापटीप आणि दिमाखात वावरणार्‍या शेखरला आज मात्र रुमालाने चेहार लपवण्याची पाळी आली . 1995-96 साली शेखर कलमाडींचा सेक्रेटरी बनला. त्यापूर्वी तो रेल्वेत कामाला होता. पुण्यातील निवडणुकीचा मास्टर प्लान असो अथवा कलमाडींचे दैनंदिन काम प्रत्येक ठिकाणी शेखरचा शब्द अंतिम असतो. कलमाडींनी आपणासोबत पुण्यात जी मोजकी माणस सोबत नेली त्यात शेखरचं स्थान टॉपमोस्ट होतं. कलमाडींच्या सगळ्या व्यवहारांना अंतिम स्वरुप देण्याची जबाबदारी शेखरवर आहे. आणि याचसाठी शेखरची कॉमनवेल्थ गेम्सच्या डायरेक्टरपदी नेमणूक करण्यात आली होती. कॉमनवेल्थमधील स्टेडियमच्या सब कॉण्ट्रक्टमध्ये चारसो बीशी केल्याचा आरोप शेखरवर ठेवण्यात आला आहे..

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 11, 2011 01:06 PM IST

पुण्यात कलमाडींच्या पीएला अटक

11 फेब्रुवारी

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडींना आणखी एक धक्का बसला आहे. सुरेश कलमाडी यांचे पीए आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे शेखर देवरुखकर यांना सीबीआयनं अटक केली आहे. पुण्याच्या कोथरुड भागातून सीबीआयनं देवरुखकर यांना अटक केली आहे. देवरुखकर यांची कसून चौकशी करण्यासाठी सीबीआयनं त्यांच्या ट्रांझिट रिमांडची मागणी केली होती. ही मागणी शिवाजीनगर कोर्टानं मान्य केली. शेखर देवरुखकर यांना सोमवारी अकराच्या आत पटियाला कोर्टात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या 15 वर्षापासून ते कलमाडींचे पी ए आहेत. कलमाडींचे अंत्यत विश्वासू म्हणूनही ते परिचित आहेत.

शेखर देवरुखकर आणि कलमाडींशी त्यांचे काय हितसंबंध होते.

कलमाडींची सावली म्हणून शेखर देवरूखकर ओळखला जातो. कलमाडींचा गेट पास म्हणून शेखर महत्वाचा मानला जातो. त्याला बायपास करून कलमाडींपर्यंत पोहचणं केवळ अशक्य. एरव्ही टापटीप आणि दिमाखात वावरणार्‍या शेखरला आज मात्र रुमालाने चेहार लपवण्याची पाळी आली . 1995-96 साली शेखर कलमाडींचा सेक्रेटरी बनला. त्यापूर्वी तो रेल्वेत कामाला होता. पुण्यातील निवडणुकीचा मास्टर प्लान असो अथवा कलमाडींचे दैनंदिन काम प्रत्येक ठिकाणी शेखरचा शब्द अंतिम असतो. कलमाडींनी आपणासोबत पुण्यात जी मोजकी माणस सोबत नेली त्यात शेखरचं स्थान टॉपमोस्ट होतं. कलमाडींच्या सगळ्या व्यवहारांना अंतिम स्वरुप देण्याची जबाबदारी शेखरवर आहे. आणि याचसाठी शेखरची कॉमनवेल्थ गेम्सच्या डायरेक्टरपदी नेमणूक करण्यात आली होती. कॉमनवेल्थमधील स्टेडियमच्या सब कॉण्ट्रक्टमध्ये चारसो बीशी केल्याचा आरोप शेखरवर ठेवण्यात आला आहे..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 11, 2011 01:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close