S M L

दिग्दर्शकाकडून खंडणी उकळणार्‍या पोलिसावर कारवाईचा 'ड्रामा'

12 फेब्रुवारीचित्रपट दिग्दर्शकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. पण तीन महिने उलटल्यानंतरही कोणतीही कारवाई झालेली नाही. सध्या ठाणे ऍन्टी करप्शन ब्युरोमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी, तुळजापुरचे सहायक पोलीस आयुक्त प्रदीप बाबर यांचा त्यात समावेश आहे. या दोघांसह चित्रपट निर्माते अमेय जोशी यांनी 2007 मध्ये 'बघ हात दाखवून' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल भंडारीकडून खंडणी उकळली होती. याप्रकरणी भंडारी यांनी हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानुसार कोर्टानं या तिघांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. पण तीन महिन्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. शिवाय कोर्टाचा आदेश असूनही त्या खटल्याचं पुढं काय झालं हे नवं आयुक्ताना नाही अजून माहितीच नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 12, 2011 10:45 AM IST

दिग्दर्शकाकडून खंडणी उकळणार्‍या पोलिसावर कारवाईचा 'ड्रामा'

12 फेब्रुवारी

चित्रपट दिग्दर्शकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. पण तीन महिने उलटल्यानंतरही कोणतीही कारवाई झालेली नाही. सध्या ठाणे ऍन्टी करप्शन ब्युरोमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी, तुळजापुरचे सहायक पोलीस आयुक्त प्रदीप बाबर यांचा त्यात समावेश आहे. या दोघांसह चित्रपट निर्माते अमेय जोशी यांनी 2007 मध्ये 'बघ हात दाखवून' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल भंडारीकडून खंडणी उकळली होती. याप्रकरणी भंडारी यांनी हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानुसार कोर्टानं या तिघांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. पण तीन महिन्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. शिवाय कोर्टाचा आदेश असूनही त्या खटल्याचं पुढं काय झालं हे नवं आयुक्ताना नाही अजून माहितीच नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2011 10:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close