S M L

कलमाडींचे पीए देवरुखकर यांना 17 फेब्रुवारीपर्यंत सीबीआय कोठडी

12 फेब्रुवारीकॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडी यांचे पीए आणि विश्वासू सहकारी शेखर देवरुखकर यांना 5 दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे. देवरुखकर यांना काल पुण्यातल्या कोथरुड परिसरात अटक करण्यात आली होती. त्यांना आज दुपारी दिल्लीत आणल्यानंतर पटियाळा हाऊस कोर्टातल्या न्यायमूतीर्ंच्या घरी हजर करण्यात आलं. कॉमनवेल्थ खेळांदरम्यान झालेल्या ओव्हरलेज घोटाळ्याच्या चौकशीसाठी सीबीआयने देवरुखकरांची कोठडी मागितली. ती मान्य करत कोर्टानं देवरुखकरांना 17 फेब्रुवारीपर्यंत सीबीआय कोठडी ठोठावली आहे. देवरुखकर हे दिल्ली कॉमनवेल्थ संयोजन समितीमध्ये होते. कॉमनवेल्थ प्रकरणातल्या फसवणुकीसाठी पुण्याच्या कोथरुड भागातून सीबीआयने देवरुखकर यांना अटक केली. देवरुखकर यांची कसून चौकशी करण्यासाठी सीबीआयने त्यांच्या ट्रांझिट रिमांडची मागणी केली होती. शेखर देवरुखकर यांना सोमवारी अकराच्या आत पटियाला कोर्टात हजर करण्याचे आदेश देण्यात आलेत. शेखर यांना आयपीसी च्या 420 कलम आणि 120 ब अंतर्गत अटक करण्यात आली. शेखर यांना कोथरुड इथल्या निवासस्थानावरुन अटक करण्यात आली. दिल्लीवरुन सीबीआयची स्पेशल टीमने ही कारवाई केली. त्यांना जिल्हा न्यायमूर्ती ए सरदेसाई यांच्यापुढे हजर करण्यात आलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 12, 2011 02:55 PM IST

कलमाडींचे पीए देवरुखकर यांना 17 फेब्रुवारीपर्यंत सीबीआय कोठडी

12 फेब्रुवारी

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडी यांचे पीए आणि विश्वासू सहकारी शेखर देवरुखकर यांना 5 दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे. देवरुखकर यांना काल पुण्यातल्या कोथरुड परिसरात अटक करण्यात आली होती. त्यांना आज दुपारी दिल्लीत आणल्यानंतर पटियाळा हाऊस कोर्टातल्या न्यायमूतीर्ंच्या घरी हजर करण्यात आलं. कॉमनवेल्थ खेळांदरम्यान झालेल्या ओव्हरलेज घोटाळ्याच्या चौकशीसाठी सीबीआयने देवरुखकरांची कोठडी मागितली. ती मान्य करत कोर्टानं देवरुखकरांना 17 फेब्रुवारीपर्यंत सीबीआय कोठडी ठोठावली आहे.

देवरुखकर हे दिल्ली कॉमनवेल्थ संयोजन समितीमध्ये होते. कॉमनवेल्थ प्रकरणातल्या फसवणुकीसाठी पुण्याच्या कोथरुड भागातून सीबीआयने देवरुखकर यांना अटक केली. देवरुखकर यांची कसून चौकशी करण्यासाठी सीबीआयने त्यांच्या ट्रांझिट रिमांडची मागणी केली होती. शेखर देवरुखकर यांना सोमवारी अकराच्या आत पटियाला कोर्टात हजर करण्याचे आदेश देण्यात आलेत. शेखर यांना आयपीसी च्या 420 कलम आणि 120 ब अंतर्गत अटक करण्यात आली. शेखर यांना कोथरुड इथल्या निवासस्थानावरुन अटक करण्यात आली. दिल्लीवरुन सीबीआयची स्पेशल टीमने ही कारवाई केली. त्यांना जिल्हा न्यायमूर्ती ए सरदेसाई यांच्यापुढे हजर करण्यात आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2011 02:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close