S M L

पेट्रोल पंपचालकांचा पेट्रोल साठा न उचलण्याचा निर्णय !

संजय वरकड, औरंगाबाद12 फेब्रुवारीमालेगावाचे अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या मृत्यूनंतर राज्यातील पेट्रोलपंप मालकांचा पुरवठा विभाग आणि पेट्रोल कंपन्यासोबतच पोलिसांशीही संघर्ष सुरू झाला आहे. तपासणीच्या नावाखाली पेट्रोलपंप मालकांना वेठीस धरल्याचा आरोप करीत मराठवाडयासह खान्देश, विदर्भातील पंपमालकांनी आजपासून साठाच न उचलण्याचा निर्णय घेतला आहे. पंप मालकांनी घेतलेल्या आक्षेपांमुळे पेट्रोल डिझेल माफियांचे पितळ उघडे पडले आहे. मराठवाडा विदर्भ आणि खान्देशातील पेट्रोलपंपमालंकांची औरंगाबादेत झालेल्या बैठकीत भेसळ करणार्‍यांचे बिंग फुटले. कंपनीतून टँकर निघाल्यानंतर पंपापर्यत पोहचेपर्यंतची जबाबदारी कंपनीची असते. शिवाय टँकर उतरवताना पुन्हा तपासणी होते. तरीही पुन्हा तपासणी होत असल्याने कंपनीनं पुरविलेल्या मालावर त्यांचाच विश्वास नाही का असा सवाल पंप मालकांनी उपस्थित केला आहे.सर्वात धक्कादायक म्हणजे सध्या तपासणीला आलेले पुरवठा विभागाचे आणि कंपन्याचे अधिकारीही पेट्रोलपंप मालकांना त्रास देत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्याहुनही गंभीर म्हणजे सॅम्पल घेतल्यानंतर त्याचा चांगला रिर्पोट देण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. मात्र त्याबाबत जाहीर बोलण्यास पंपमालकांनी नकार दिला. पंपमालकांनी केलेल्या सूचनांवर तर सर्वच जण गोंधळून गेले. यात सर्व महत्वांच्या मागण्याबाबत पेट्रोलपंप मालक आक्रमक झाले असून तोडगा निघेपर्यंत ते आंदोलन करणार आहे. पेट्रोलपंप चालकांच्या सूचना- टँकर उतरवताना तपासणी व्हावी- टँकर उतरल्यावनंतर पंपाला जे कुलुप लावतात त्याची चावीही कंपनीच्या अधिकार्‍यांकडे ठेवावी- अथवा ती सरकारी यंत्रणेच्या हाती असावी- म्हणजे तपासणीत काही गैर आढळले तरी त्याची जबाबदारी पंपमालकांवर उरणार नाही- प्रत्येक पंपावर तपासणी लॅब असावी, आणि ग्राहकाला वाटल्यास त्याने कधीही तपासणी करून घ्यावी- सरकारच्या लॅबसोबतच इतर लॅबचाही वापर करावा, जेणेकरून मनस्ताप होणार नाही

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 12, 2011 03:16 PM IST

पेट्रोल पंपचालकांचा पेट्रोल साठा न उचलण्याचा निर्णय !

संजय वरकड, औरंगाबाद

12 फेब्रुवारी

मालेगावाचे अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या मृत्यूनंतर राज्यातील पेट्रोलपंप मालकांचा पुरवठा विभाग आणि पेट्रोल कंपन्यासोबतच पोलिसांशीही संघर्ष सुरू झाला आहे. तपासणीच्या नावाखाली पेट्रोलपंप मालकांना वेठीस धरल्याचा आरोप करीत मराठवाडयासह खान्देश, विदर्भातील पंपमालकांनी आजपासून साठाच न उचलण्याचा निर्णय घेतला आहे. पंप मालकांनी घेतलेल्या आक्षेपांमुळे पेट्रोल डिझेल माफियांचे पितळ उघडे पडले आहे.

मराठवाडा विदर्भ आणि खान्देशातील पेट्रोलपंपमालंकांची औरंगाबादेत झालेल्या बैठकीत भेसळ करणार्‍यांचे बिंग फुटले. कंपनीतून टँकर निघाल्यानंतर पंपापर्यत पोहचेपर्यंतची जबाबदारी कंपनीची असते. शिवाय टँकर उतरवताना पुन्हा तपासणी होते. तरीही पुन्हा तपासणी होत असल्याने कंपनीनं पुरविलेल्या मालावर त्यांचाच विश्वास नाही का असा सवाल पंप मालकांनी उपस्थित केला आहे.

सर्वात धक्कादायक म्हणजे सध्या तपासणीला आलेले पुरवठा विभागाचे आणि कंपन्याचे अधिकारीही पेट्रोलपंप मालकांना त्रास देत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्याहुनही गंभीर म्हणजे सॅम्पल घेतल्यानंतर त्याचा चांगला रिर्पोट देण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. मात्र त्याबाबत जाहीर बोलण्यास पंपमालकांनी नकार दिला. पंपमालकांनी केलेल्या सूचनांवर तर सर्वच जण गोंधळून गेले. यात सर्व महत्वांच्या मागण्याबाबत पेट्रोलपंप मालक आक्रमक झाले असून तोडगा निघेपर्यंत ते आंदोलन करणार आहे.

पेट्रोलपंप चालकांच्या सूचना

- टँकर उतरवताना तपासणी व्हावी- टँकर उतरल्यावनंतर पंपाला जे कुलुप लावतात त्याची चावीही कंपनीच्या अधिकार्‍यांकडे ठेवावी- अथवा ती सरकारी यंत्रणेच्या हाती असावी- म्हणजे तपासणीत काही गैर आढळले तरी त्याची जबाबदारी पंपमालकांवर उरणार नाही- प्रत्येक पंपावर तपासणी लॅब असावी, आणि ग्राहकाला वाटल्यास त्याने कधीही तपासणी करून घ्यावी- सरकारच्या लॅबसोबतच इतर लॅबचाही वापर करावा, जेणेकरून मनस्ताप होणार नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2011 03:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close