S M L

पत्रकारांवर हल्ला करणार्‍या माफियांवर मोक्का लावण्याची ग्रामस्थांची मागणी

14 फेब्रुवारीसरकारने माफियांवर धाडी टाकल्याची कारवाई केली तरी, वाळू माफियांची मुजोरी राज्यभर सुरुच आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या नागलवाडीत अवैध वाळू उपशाची बातमी कव्हर करायला गेलेल्या पत्रकारांना ठेकेदारानं आणि त्यांच्या गुंडांनी मारहाण केली. आयबीएन लोकमतने या सर्व माफियांविरोधात जंग माफियाची अशी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. आमचे अहमदनगरचे रिपोर्टर साहेबराव कोकणे 50 ते 60 नागरिकांसोबत बेकायदेशीर वाळू उपशाच्या घटनास्थळी पोहचले होते. तेव्हा साहेबराव कोकणे यांच्यासह ग्रामस्थांना या माफियांनी मारहाण केली. दोन गाड्यांची आणि कॅमेर्‍यांची यावेळी नासधुस करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात तहसीलदारांकडे तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने नागरिकांनी आयबीएन लोकमतच्या माध्यमातून या प्रश्नाचा पर्दाफाश केला होता. आणि या प्रकरणाची माहिती मिळालेल्या माफियांनी दबा धरुन हा हल्ला केला. दरम्यान, आज नागलवाडीत ग्रामसभा घेण्यात आली. यात गावकरी आणि पत्रकारांवर हल्ले करणार्‍यांना अटक करुन मोक्का लावण्याची मागणी करण्यात आली. काल रविवारी वाळू माफियांनी पत्रकार आणि ग्रामस्थांना मारहाण केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 14, 2011 11:11 AM IST

पत्रकारांवर हल्ला करणार्‍या माफियांवर मोक्का लावण्याची ग्रामस्थांची मागणी

14 फेब्रुवारी

सरकारने माफियांवर धाडी टाकल्याची कारवाई केली तरी, वाळू माफियांची मुजोरी राज्यभर सुरुच आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या नागलवाडीत अवैध वाळू उपशाची बातमी कव्हर करायला गेलेल्या पत्रकारांना ठेकेदारानं आणि त्यांच्या गुंडांनी मारहाण केली. आयबीएन लोकमतने या सर्व माफियांविरोधात जंग माफियाची अशी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. आमचे अहमदनगरचे रिपोर्टर साहेबराव कोकणे 50 ते 60 नागरिकांसोबत बेकायदेशीर वाळू उपशाच्या घटनास्थळी पोहचले होते. तेव्हा साहेबराव कोकणे यांच्यासह ग्रामस्थांना या माफियांनी मारहाण केली. दोन गाड्यांची आणि कॅमेर्‍यांची यावेळी नासधुस करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात तहसीलदारांकडे तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने नागरिकांनी आयबीएन लोकमतच्या माध्यमातून या प्रश्नाचा पर्दाफाश केला होता. आणि या प्रकरणाची माहिती मिळालेल्या माफियांनी दबा धरुन हा हल्ला केला. दरम्यान, आज नागलवाडीत ग्रामसभा घेण्यात आली. यात गावकरी आणि पत्रकारांवर हल्ले करणार्‍यांना अटक करुन मोक्का लावण्याची मागणी करण्यात आली. काल रविवारी वाळू माफियांनी पत्रकार आणि ग्रामस्थांना मारहाण केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 14, 2011 11:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close