S M L

जळगाव महापालिकेत भाजपचा राडा

14 फेब्रुवारीजळगाव महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या कार्यालयात आज भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार तोडफोड केली. वाढीव पाणीपट्टीच्या मुद्यावर भाजप कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली. यामध्ये भाजपचे नगरसेवक, गटनेते सहभागी होते.स्थायी समिती कार्यालयाची काचा फोडल्या. कार्यकर्त्यांनी पालिका आयुक्त आणि महापौरांच्या दिशेने हातातील काळ्या पिशव्या फेकून मारल्या. या तोडफोडीला जैन- खडसे वादाची किनार आहे. सध्या पालिकेत सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वातील खान्देश विकास आघाडीची सत्ता आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि सुरेशदादा जैन यांच्यातील राजकीय वादाचे पडसाद म्हणून ही तोडफोड झाल्याचं बोललं जातं आहे. विधानपरिषद निवडणुकीनंतर दोनही नेत्यांदरम्यान एकमेकांवर प्रहार सुरु आहेत. मात्र यात कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 14, 2011 08:39 AM IST

जळगाव महापालिकेत भाजपचा राडा

14 फेब्रुवारी

जळगाव महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या कार्यालयात आज भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार तोडफोड केली. वाढीव पाणीपट्टीच्या मुद्यावर भाजप कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली. यामध्ये भाजपचे नगरसेवक, गटनेते सहभागी होते.स्थायी समिती कार्यालयाची काचा फोडल्या. कार्यकर्त्यांनी पालिका आयुक्त आणि महापौरांच्या दिशेने हातातील काळ्या पिशव्या फेकून मारल्या. या तोडफोडीला जैन- खडसे वादाची किनार आहे. सध्या पालिकेत सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वातील खान्देश विकास आघाडीची सत्ता आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि सुरेशदादा जैन यांच्यातील राजकीय वादाचे पडसाद म्हणून ही तोडफोड झाल्याचं बोललं जातं आहे. विधानपरिषद निवडणुकीनंतर दोनही नेत्यांदरम्यान एकमेकांवर प्रहार सुरु आहेत. मात्र यात कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 14, 2011 08:39 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close