S M L

ऑस्ट्रेलियाला हरवून भारताची विजयी सलामी

14 फेब्रुवारीपहिल्या सराव सामान्यात काल रविवारी भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 38 रन्सनी पराभव केला आहे. भारताने ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी 215 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. ऑस्ट्रेलिया हे लक्ष्य सहज गाठेल असं वाटतं असतानाच भारताच्या स्पिनर्सनं दमदार कामगिरी केली आणि ऑस्ट्रेलियाला 176 रनवर ऑलआऊट केलं. भारतातर्फे पियुष चावलाने 4 तर हरभजनने 3 विकेट घेतल्या. त्यापूर्वी धोणीनं टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली. पण सेहवागचा अपवाद वगळता इतरांनी मात्र निराशा केली. सेहवागने सर्वाधिक 54 रन केले. तर युसुफचे 32 आणि आर अश्विनच्या 25 रनमुळे भारतीय टीमने दोनशे रनचा टप्पा ओलांडला. या मॅचसाठी भारताने सचिन तेंडुलकर आणि झहीर खान यांना विश्रांती दिली होती. भारतीय टीमची हा पहिला सराव सामना होता. तर येत्या 19 तारखेला भारतीय टीम बांगलादेश विरुद्ध आपली पहिली मॅच खेळणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 14, 2011 09:51 AM IST

ऑस्ट्रेलियाला हरवून भारताची विजयी सलामी

14 फेब्रुवारी

पहिल्या सराव सामान्यात काल रविवारी भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 38 रन्सनी पराभव केला आहे. भारताने ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी 215 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. ऑस्ट्रेलिया हे लक्ष्य सहज गाठेल असं वाटतं असतानाच भारताच्या स्पिनर्सनं दमदार कामगिरी केली आणि ऑस्ट्रेलियाला 176 रनवर ऑलआऊट केलं. भारतातर्फे पियुष चावलाने 4 तर हरभजनने 3 विकेट घेतल्या. त्यापूर्वी धोणीनं टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली. पण सेहवागचा अपवाद वगळता इतरांनी मात्र निराशा केली. सेहवागने सर्वाधिक 54 रन केले. तर युसुफचे 32 आणि आर अश्विनच्या 25 रनमुळे भारतीय टीमने दोनशे रनचा टप्पा ओलांडला. या मॅचसाठी भारताने सचिन तेंडुलकर आणि झहीर खान यांना विश्रांती दिली होती. भारतीय टीमची हा पहिला सराव सामना होता. तर येत्या 19 तारखेला भारतीय टीम बांगलादेश विरुद्ध आपली पहिली मॅच खेळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 14, 2011 09:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close