S M L

रक्तदान करुन साजरा केला व्हॅलेंटाईन डे

14 फेब्रुवारीआजचा दिवस युवा पिढीसाठी विशेष आहे आणि हा दिवस आपल्या आवडत्या व्यक्ती बरोबर साजरा करते. पण कोल्हापुरात असा एक युवा ग्रुप आहे जो व्हॅलेंटाईन डे ला रक्तदान करुन साजरा करत आहे. या ग्रुपचं नाव आहे युवा स्ट्रेंथ ऑफ टुमॉरो ऑर्रगनायझेशन. ' तरुणांनो जागे व्हा... व्हॅलेंटाईन डेला प्रेम व्यक्त करणं हा तर तुमचा हक्कचं आहे. पण अनेकांना जिवनदान देऊन तुम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा करु शकता' हा संदेश या तरुणांनी दिला आहे. या उपक्रमाला तरुण पिढीचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आजच्या दिवशी शंभरहून अधिक युवकांनी रक्तदान केलं आहे. यापुढंही हा उपक्रम असाच साजरा करण्याचा या संस्थेच्या युवकांचा ध्यास आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 14, 2011 10:53 AM IST

रक्तदान करुन साजरा केला व्हॅलेंटाईन डे

14 फेब्रुवारी

आजचा दिवस युवा पिढीसाठी विशेष आहे आणि हा दिवस आपल्या आवडत्या व्यक्ती बरोबर साजरा करते. पण कोल्हापुरात असा एक युवा ग्रुप आहे जो व्हॅलेंटाईन डे ला रक्तदान करुन साजरा करत आहे. या ग्रुपचं नाव आहे युवा स्ट्रेंथ ऑफ टुमॉरो ऑर्रगनायझेशन. ' तरुणांनो जागे व्हा... व्हॅलेंटाईन डेला प्रेम व्यक्त करणं हा तर तुमचा हक्कचं आहे. पण अनेकांना जिवनदान देऊन तुम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा करु शकता' हा संदेश या तरुणांनी दिला आहे. या उपक्रमाला तरुण पिढीचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आजच्या दिवशी शंभरहून अधिक युवकांनी रक्तदान केलं आहे. यापुढंही हा उपक्रम असाच साजरा करण्याचा या संस्थेच्या युवकांचा ध्यास आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 14, 2011 10:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close