S M L

पुण्यात बेकायदेशीररित्या राहणार्‍या बांगलादेशी नागरिकाला अटक

14 फेब्रुवारीजर्मन बेकरी बॉम्बस्फोटाला काल रविवारी एक वर्ष पूर्ण झालं. या स्फोटाचा तपास अजून सुरूच आहे. त्यातच बेकायदेशीररित्या पुण्यात राहणार्‍या एका बांगलादेशी नागरिकाला पुणे दहशतवादविरोधी पथकानं अटक केली आहे. दीड वर्षांपूर्वी भारतात आलेल्या मिलोन निरंजन मिस्त्री या 24 वर्षीय तरुणाचे गेल्या 6 महिन्यांपासून नारायणगावात वास्तव्य होतं. मिलोनकडे बनावट भारतीय पॅनकार्ड सापडल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. झडतीमध्ये त्याच्याकडे बांगलादेशी जन्मदाखला सापडला. तसेच त्याच्याकडे बांगलादेश आणि पाकिस्तानातील काही दूरध्वनी क्रमांक, संशयास्पद कागदपत्रहीं सापडली. तसेच त्याने गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानातही वारंवार दूरध्वनी केल्याचे तपासात आढळले आहे. रोजगारासाठी आपण भारतात आल्याचे सांगणार्‍या मिलोनला इतर प्रश्नांची मात्र समाधानकारक उत्तरं देता आली नाही. त्यामुळे त्याची दहशतवादविरोधी पथकाकडून सखोल चौकशी सुरू आहे. त्यासाठी इतर तपास यंत्रणांचीही मदत घेण्यात येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 14, 2011 06:02 PM IST

पुण्यात बेकायदेशीररित्या राहणार्‍या बांगलादेशी नागरिकाला अटक

14 फेब्रुवारी

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाला काल रविवारी एक वर्ष पूर्ण झालं. या स्फोटाचा तपास अजून सुरूच आहे. त्यातच बेकायदेशीररित्या पुण्यात राहणार्‍या एका बांगलादेशी नागरिकाला पुणे दहशतवादविरोधी पथकानं अटक केली आहे. दीड वर्षांपूर्वी भारतात आलेल्या मिलोन निरंजन मिस्त्री या 24 वर्षीय तरुणाचे गेल्या 6 महिन्यांपासून नारायणगावात वास्तव्य होतं. मिलोनकडे बनावट भारतीय पॅनकार्ड सापडल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. झडतीमध्ये त्याच्याकडे बांगलादेशी जन्मदाखला सापडला. तसेच त्याच्याकडे बांगलादेश आणि पाकिस्तानातील काही दूरध्वनी क्रमांक, संशयास्पद कागदपत्रहीं सापडली. तसेच त्याने गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानातही वारंवार दूरध्वनी केल्याचे तपासात आढळले आहे. रोजगारासाठी आपण भारतात आल्याचे सांगणार्‍या मिलोनला इतर प्रश्नांची मात्र समाधानकारक उत्तरं देता आली नाही. त्यामुळे त्याची दहशतवादविरोधी पथकाकडून सखोल चौकशी सुरू आहे. त्यासाठी इतर तपास यंत्रणांचीही मदत घेण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 14, 2011 06:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close