S M L

वाळूमाफियांची मुजोरीपणाला गावकर्‍यांचा इशारा

16 फेब्रुवारीराज्यात वाळूमाफियांची मुजोरी सुरू असतानाच प्रशासनही या मुजोरीकडे डोळेझाक करतं आहे. पुणे शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावरील निरगुडी गावच्या ग्रामस्थानी बेकायदेशीर वाळू उपशाकडे प्रशासनाचं लक्ष वेधल्यानंतर केवळ जुजबी पंचनामा सुरू केला मात्र वाळूचा अनिर्बंध उपसा सुरूच राहिल्याने गावकर्‍यांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.पुण्याजवळच्या निरगुडी गावात इंद्रायणी नदीच्या वाळूच्या एका पट्‌ट्याचा ठेका भोसरीच्या ठेकेदार जनाबाई काकडे हिने 15 लाखाची बोली लावून घेतला. पण यांत्रिक बोटीची परवानगी मिळण्याआधीच इथे एक हजार ब्रास वाळू उपसा झाला ही. याची तक्रार गावच्या सरपंचांनी सर्कल अधिकार्‍याकडे केली. आणि अधिकार्‍यानी पंचनामाही केला पण कारवाई झालीच नाही.वाळू ठेकेदार जनाबाई काकडे यांनी मात्र आतापर्यंत फक्त 50 ब्रास वाळू उपसा केल्याचा दावा केला आहे. आणि यासाठी टक्केवारी मागितल्याचा सरपंचांवरच आरोप केलायअनिर्बंध वाळू उपशामुळे नदीच्या पात्राची पुरती वाट लागली आहे असं जागोजागी पाहायला मिळत आहे. वाळू वाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. ठेेकेदार, कंत्राटदार, दलाल, ट्रक चालक ते बांधकाम व्यावसायिक आणि सरकारी यंत्रणा अशी ही साखळी आहे. डोळ्यावर पट्टी बांधलेलं प्रशासनही या बजबजपुरीला तेवढंच जबाबदार आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 16, 2011 04:00 PM IST

वाळूमाफियांची मुजोरीपणाला गावकर्‍यांचा इशारा

16 फेब्रुवारी

राज्यात वाळूमाफियांची मुजोरी सुरू असतानाच प्रशासनही या मुजोरीकडे डोळेझाक करतं आहे. पुणे शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावरील निरगुडी गावच्या ग्रामस्थानी बेकायदेशीर वाळू उपशाकडे प्रशासनाचं लक्ष वेधल्यानंतर केवळ जुजबी पंचनामा सुरू केला मात्र वाळूचा अनिर्बंध उपसा सुरूच राहिल्याने गावकर्‍यांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पुण्याजवळच्या निरगुडी गावात इंद्रायणी नदीच्या वाळूच्या एका पट्‌ट्याचा ठेका भोसरीच्या ठेकेदार जनाबाई काकडे हिने 15 लाखाची बोली लावून घेतला. पण यांत्रिक बोटीची परवानगी मिळण्याआधीच इथे एक हजार ब्रास वाळू उपसा झाला ही. याची तक्रार गावच्या सरपंचांनी सर्कल अधिकार्‍याकडे केली. आणि अधिकार्‍यानी पंचनामाही केला पण कारवाई झालीच नाही.

वाळू ठेकेदार जनाबाई काकडे यांनी मात्र आतापर्यंत फक्त 50 ब्रास वाळू उपसा केल्याचा दावा केला आहे. आणि यासाठी टक्केवारी मागितल्याचा सरपंचांवरच आरोप केलायअनिर्बंध वाळू उपशामुळे नदीच्या पात्राची पुरती वाट लागली आहे असं जागोजागी पाहायला मिळत आहे. वाळू वाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. ठेेकेदार, कंत्राटदार, दलाल, ट्रक चालक ते बांधकाम व्यावसायिक आणि सरकारी यंत्रणा अशी ही साखळी आहे. डोळ्यावर पट्टी बांधलेलं प्रशासनही या बजबजपुरीला तेवढंच जबाबदार आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 16, 2011 04:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close