S M L

मंत्रिमंडळांच्या बैठकीत आर.आर.पाटील लक्ष्य

5 नोव्हेंबर, मुंबई बेस्टमध्ये गोळीबार करणारा राहुल राज पोलिसांच्या कारवाईत मारला गेला. त्यानंतर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना, गोली का जबाब गोली से देंगे हे वक्तव्य उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनी केलं होतं. या वक्तव्यामुळं बिहारी नेत्यांनी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात रान माजवलं होतं. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतसुद्धा याच मुद्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी आर. आर. पाटील यांना लक्ष्य केलं. त्यामुळं अखेर गोली का जबाब गोली से हे वक्तव्य आपण राहुल राज प्रकरणी नव्हे तर नक्षलवाद्यांच्या कारवाईसंदर्भात केलं होतं, असा खुलासा आबांना करावा लागला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळांच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी आबांना लक्ष्य केलं.त्या वक्तव्यामुळे देशभरात महाराष्ट्राचीच नव्हे तर राष्ट्रवादीची नाचक्की झाली, असं आबांना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी बैठकीत सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 5, 2008 03:32 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2008 03:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close