S M L

पाकिस्तानच्या टीमला मुंबईत खेळू खेळू न देण्याचा शिवसेनेचा इशारा

17 फेब्रुवारीक्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. पण एवढी मोठी स्पर्धा भारतात होत असताना शिवसेनेने मात्र स्पर्धेच्या निमित्ताने वेगळीच राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्न चालवला आहे. वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानची टीम फायनलमध्ये पोहोचणारच नाही पण जर पोहोचलीच तर त्यांची मॅच मुंबईत खेळू द्यायची की नाही ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच ठरवतील असं विधान शिवसेनेचे खासदार मनोहर जोशी यांनी केलं. पाकिस्तानला देशात खेळू द्यायचे नाही ही शिवसेनेची भूमिका कायम आहे असं ते म्हणाले. खासदारांच्या सर्वपक्षीय बैठकीपूर्वी मीडियाशी बोलताना जोशी यांनी हा इशारा दिला. अर्थात शिवसेनेची नक्की भूमिका आणि पुढची आंदोलनाची दिशा फायनल जवळ आल्यावर आणि पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचले तर ठरवण्यात येईल असं म्हणायला ते विसरले नाहीत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 17, 2011 09:58 AM IST

पाकिस्तानच्या टीमला मुंबईत खेळू खेळू न देण्याचा शिवसेनेचा इशारा

17 फेब्रुवारी

क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. पण एवढी मोठी स्पर्धा भारतात होत असताना शिवसेनेने मात्र स्पर्धेच्या निमित्ताने वेगळीच राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्न चालवला आहे. वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानची टीम फायनलमध्ये पोहोचणारच नाही पण जर पोहोचलीच तर त्यांची मॅच मुंबईत खेळू द्यायची की नाही ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच ठरवतील असं विधान शिवसेनेचे खासदार मनोहर जोशी यांनी केलं. पाकिस्तानला देशात खेळू द्यायचे नाही ही शिवसेनेची भूमिका कायम आहे असं ते म्हणाले. खासदारांच्या सर्वपक्षीय बैठकीपूर्वी मीडियाशी बोलताना जोशी यांनी हा इशारा दिला. अर्थात शिवसेनेची नक्की भूमिका आणि पुढची आंदोलनाची दिशा फायनल जवळ आल्यावर आणि पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचले तर ठरवण्यात येईल असं म्हणायला ते विसरले नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 17, 2011 09:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close