S M L

अडवाणींनी मागितली सोनिया गांधी यांची माफी

18 फेब्रुवारीभाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांची माफी मागितली. सोनिया गांधी आणि दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचं परदेशी बँकेमध्ये खातं असल्याचा आरोप अडवाणींंनी केला होता. त्यांनतर सोनिया गांधींनी अडवाणी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. तसेच अशाप्रकारचे कुठलंही खात दोघांच्या नावावर कुठल्याही परदेशी बँकेमध्ये नसल्याचं त्यांनी त्या पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर आज गुवाहाटीमध्ये भाजपच्या एका सभेत अडवाणी यांनी सोनिया गांधींची माफी मागितली. तसेच त्यांनी यावेळी परदेशी बँकेमध्ये देशातल्या किती लोकांचे पैसे गुंतलेले आहेत त्याची यादी सरकारने जाहीर करावी, अशी मागणी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 18, 2011 05:22 PM IST

अडवाणींनी मागितली सोनिया गांधी यांची माफी

18 फेब्रुवारी

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांची माफी मागितली. सोनिया गांधी आणि दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचं परदेशी बँकेमध्ये खातं असल्याचा आरोप अडवाणींंनी केला होता. त्यांनतर सोनिया गांधींनी अडवाणी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. तसेच अशाप्रकारचे कुठलंही खात दोघांच्या नावावर कुठल्याही परदेशी बँकेमध्ये नसल्याचं त्यांनी त्या पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर आज गुवाहाटीमध्ये भाजपच्या एका सभेत अडवाणी यांनी सोनिया गांधींची माफी मागितली. तसेच त्यांनी यावेळी परदेशी बँकेमध्ये देशातल्या किती लोकांचे पैसे गुंतलेले आहेत त्याची यादी सरकारने जाहीर करावी, अशी मागणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2011 05:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close