S M L

पुण्यात सायक्लोथॉन स्पर्धेचं आयोजन

18 फेब्रुवारीसायकलींचे शहर अशी एकेकाळी ओळख असणार्‍या पुण्यामध्ये हे चित्र पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी मिळणार आहे. निमित्त आहे स्पोर्ट्स 18 तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सायक्लोथॉन या स्पर्धेचं. येत्या 27 फेब्रुवारीला पुण्यामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. सायक्लोथॉन या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या देशांमधले सायकलपटू सहभागी होणार आहे. आज शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत हिरो सायकल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर पंकज मुंजाळ यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत या स्पर्धेसाठी एक हजाराहूनही अधिक सायकलपटू सहभागी झाले आहेत असंही त्यांनी सांगितले. फेमिना मिस इंडिया स्पर्धेतल्या सगळया मॉडेल्सचा सहभाग तसेच सर्व क्षेत्रातल्या नागरिकांचा सहभाग ही या स्पर्धेचं वैशिष्ट्य ठरणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 18, 2011 12:13 PM IST

पुण्यात सायक्लोथॉन स्पर्धेचं आयोजन

18 फेब्रुवारी

सायकलींचे शहर अशी एकेकाळी ओळख असणार्‍या पुण्यामध्ये हे चित्र पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी मिळणार आहे. निमित्त आहे स्पोर्ट्स 18 तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सायक्लोथॉन या स्पर्धेचं. येत्या 27 फेब्रुवारीला पुण्यामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. सायक्लोथॉन या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या देशांमधले सायकलपटू सहभागी होणार आहे. आज शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत हिरो सायकल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर पंकज मुंजाळ यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत या स्पर्धेसाठी एक हजाराहूनही अधिक सायकलपटू सहभागी झाले आहेत असंही त्यांनी सांगितले. फेमिना मिस इंडिया स्पर्धेतल्या सगळया मॉडेल्सचा सहभाग तसेच सर्व क्षेत्रातल्या नागरिकांचा सहभाग ही या स्पर्धेचं वैशिष्ट्य ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2011 12:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close